Guntur Kaaram movie : महेश बाबूचा ‘गुंटूर करम’ आता ओटीटीवर; १७७ कोटींची कमाई

Guntur Kaaram movie
Guntur Kaaram movie
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता महेश बाबूचा 'गुंटूर कारम' ( Guntur Kaaram movie ) हा चित्रपट १२ जानेवारी रोजी चाहत्यांच्या भेटीस आला. या चित्रपटाने साऊथमधील पाच चित्रपटांना टक्कर देत बॉक्स ऑफिसवर भरघोस अशी १७७.१४ कोटीची कमाई केली आहे. महेश बाबूंच्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. यानंतर आता त्याच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाचे बातमी समोर आली आहे. आता महेश बांबूचा हा चित्रपट ओटीटीवर चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. यामुळे चाहत्यांचा उत्साह वाढला आहे.

संबंधित बातम्या 

अभिनेता महेश बाबूचा 'गुंटूर कारम' ( Guntur Kaaram movie ) हा चित्रपटाची एक झलक 'नेटफ्लिक्स इंडिया' च्या इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये 'गुंटूर कारम' हा चित्रपट ओटीटीवर येत असल्याची माहिती दिली आहे. "राऊडी रमन आग लावण्यासाठी येत आहे. 'गुंटूर करम' नेटफ्लिक्सवर 9 फेब्रुवारीला तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदीमध्ये रिलीज होणार आहे." असे या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

ही माहिती सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. या पोस्टला कॉमेन्टस करताना नेटकऱ्यांनी फायर इमोजी शेअर केले आहेत. तर दुसरीकडे महेश बांबूच्या 'गुंटूर कारम' या चित्रपटाने देशांत १२३ कोटी कमाई केली आहे. तर जगभरात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १७७.१४ कोटीचा टप्पा पार केला आहे.

महेश बाबूशिवाय या चित्रपटात श्रीलीला, मीनाक्षी चौधरी, ब्रह्मानंदम, रम्या कृष्णन, जगपती बाबू, प्रकाश राज, आशिष विद्यार्थी, सुनील यांनी भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन त्रिविक्रम श्रीनिवास यांनी केलं आहे. तर निर्मिती एस. हरिका आणि हसीन क्रिएशन्स यांनी केली आहे.

महेश बाबूच्या वर्क्रफंटबद्दल बोलायचं झाल्यास, ते आगामी 'जन गण मन' या चित्रपटाच दिसणार आहेत. 'जन गण मन' हा चित्रपट पुरी जगन्नाध दिग्दर्शित केला आहे. हा तेलुगू चित्रपट आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Netflix India (@netflix_in)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news