Black Movie : चित्रपट ब्लॅकच्या ओटीटी रिलीजवर राणी मुखर्जी म्हणते... | पुढारी

Black Movie : चित्रपट ब्लॅकच्या ओटीटी रिलीजवर राणी मुखर्जी म्हणते...

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड स्टार राणी मुखर्जी OTT वर तिचा आयकॉनिक चित्रपट ब्लॅक रिलीज झाल्यानंतर प्रेमाने भारावून गेली आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन यांनी राणी मुखर्जीसोबत काम केले होते. ब्लॅकला नुकतीच १९ वर्षे पूर्ण झाली आणि सेलिब्रेट करण्यासाठी निर्मात्यांनी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज केला. (Black Movie) OTT वर लाँच झाल्यापासून, राणीला जगभरातील चाहत्यांकडून आणि चित्रपटप्रेमींकडून खूप छान प्रतिक्रिया मिळत आहेत. (Black Movie)

संबंधित बातम्या –

राणी म्हणते, “ब्लॅकला १९ वर्षांनंतरही प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे हे पाहणे खूप जबरदस्त आणि आनंददायी आहे. माझ्या फिल्मोग्राफीमध्ये या चित्रपटाला विशेष स्थान आहे. दिग्गज अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याचा आणि माझे सर्वकाळचे आवडते चित्रपट निर्माता संजय लीला भन्साळी दिग्दर्शित करण्याचा अनुभव माझ्यासोबत कायम राहील.”

ती पुढे म्हणते, “मला आनंद आहे की, हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे आणि ज्यांना १९ वर्षांपूर्वी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या ब्लॅकची जादू पाहण्यास संधी मिळाली होती, ते सर्व त्यांच्या स्क्रीनवर पाहून त्याचे साक्षीदार होऊ शकतील. तुमचे काम अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचते, हे पाहणे नेहमीच सुखद असते.”

Back to top button