Lata Mangeshkar Death Anniversary : कधीच रिलीज झाले नाही लता मंगेशकर यांचे पहिले गाणे | पुढारी

Lata Mangeshkar Death Anniversary : कधीच रिलीज झाले नाही लता मंगेशकर यांचे पहिले गाणे

पुढारी ऑनलाईन डेस्क : लता मंगेशकर (Lata Mangeshkar Death Anniversary) यांची आज ६ फेब्रुवारी, २०२२ रोजी निधन झाले होते. आजदेखील त्यांची गाणी स्मरणीय आहेत. स्वर कोकीळा लता यांचे पहिले गाणे कधीच रिलीज झाले नाही. आपल्या ७० वर्षांच्या काळात त्यांनी एनेक गाण्यांना मधूर आवाज दिला. (Lata Mangeshkar Death Anniversary)

संबंधित बातम्या –

लता मंगेशकर यांचं पहिलं गाणं चित्रपटातून हटवण्यात आलं होतं. आपल्या करिअरचं पहिलं गाणं “नाचू या गडे, खेळू सारी मनी हौस भारी” (१९४२) मध्ये ‘किती हसाल’ नावाच्या एका मराठी चित्रपटासाठी रेकॉर्ड केलं होतं. परंतु, दुर्भाग्याने हे गाणे चित्रपटाच्या अंतिम कटमधून हटवण्यात आले होते. त्यामुळे हे गाणे कधी रिलीज होऊ शकले नाही.

जेव्हा गाणे रेकॉर्ड करताना बेशुद्ध झाल्या होत्या लता

लता यांनी अनेक बड्या संगीतकारांसोबत गाणे गायले. पण, एकदा असे काही झाले की, गाणे रेकॉर्डिंग करताना त्या अचानक बेशुद्ध झाल्या होत्या. त्या संगीतकार नौशाद यांच्यासोबत एक गाणे रेकॉर्ड करताना बेशुद्ध झाल्या. त्यांनी सांगितलं होतं की, “आम्ही दुपारच्या उन्हात एक गाणे रेकॉर्ड करत होतो आणि गरमीमध्ये मुंबईतली स्थिती कशी अशते, हे तुम्हाला माहिती आहे. त्यावेळी रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये एअर कंडीशनिंग नसायचे आणि अंतिम रेकॉर्डिंग दरम्यान सीलिंग फॅन देखील बंद करण्यात आले होते, मग काय मी बेशुद्ध झाले होते.”

लता मंगेशकर एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्या स्वत:ची गाणी ऐकत नाही, कारण, जर त्यांनी आपलीच गाणी ऐकली असती तर, त्यातही अनेक दोष आढळले असते.

लता मंगेशकर यांचे पहिले गाणे हिट

१९४८ मध्ये लता यांना बोलावून चित्रपट ‘मजबूर’ (Majboor) साठी मास्टर गुलाम हैदर यांनी एक गाणे गाऊन घेतले. गाण्याचे बोल ‘दिल मेरा तोडा’ असे होते. चित्रपटासोबत गाणेदेखील हिट झाले होते. त्यानंतर लता यांचे नशीब पालटलं.

३० हजारहून अधिक गाणी गायली

लता मंगेशकर यांनी ३० हजारहून अधिक गाणी गायली आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Lata Mangeshkar (@lata_mangeshkar)

Back to top button