![जाऊ बाई गावात](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F02%2F%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%8A-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : 'जाऊ बाई गावात' या बहुचर्चित शोच्या पहिल्या पर्वाचा महाअंतिम सोहळा येत्या ११ फेब्रुवारी रोजी रंगणार आहे. हे पर्व विशेष गाजलं म्हणजे ते स्पर्धक, त्यांना दिलेले टास्क, स्पर्धकांनी गावकऱ्यांची जिंकलेली मने यामुळे. अस्सल मराठी मातीतला आणि गावाशी नाळ जोडलेला हा कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात आहे. या फिनाले आठवड्यात टॉप ५ स्पर्धकामध्ये रमशा फारुकी, रसिक ढोबळे, संस्कृती साळुंके, स्नेहा भोसले आणि श्रेजा म्हात्रे आहेत. या महाअंतिम सोहळ्याचा गावकऱ्यांसोबत चाहत्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
संबंधित बातम्या
मनोरंजन आणि तीव्र संघर्षांनी भरलेल्या ३ महिन्यांच्या रोलरकोस्टर राईडनंतर, 'जाऊ बाई गावात' चे हे स्पर्धक शोच्या ग्रँड फिनालेसाठी तयारी करत आहे. सीझनच्या विजेत्याचा मुकुट मिळवण्याचा अत्यंत अपेक्षित क्षण आठवड्याच्या शेवटी होणार आहे. या अंतिम भागात स्पर्धकांच्या आतापर्यंतच्या प्रवासाची झलक पाहायला मिळणार आहे. यासोबत हे फायनॅलिस्ट स्पर्धक दमदार परफॉर्मेंस सादर करणार आहे. तर खास पाहुणे बनून सर्वांचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर, सोनाली कुलकर्णी आणि महेश मांजरेकर येणार आहेत.
यावेळी सोनालीला दिलेला मजेशीर टास्क, स्पर्धक आणि प्रेक्षकांची उत्कंठा वाढविणार आहे. तर महेश मांजरेकर स्पर्धकांची शाळा भरणार आहेत. याशिवाय महाअंतिम सोहळ्याचा पहिल्या पर्वाचा अंतिम विजेता कोण असेल? यांची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.