GRAMMYs 2024 : जाकिर हुसैन आणि शंकर महादेवन यांना ‘ग्रॅमी’; बासुरी वादक राकेश चौरसियांनाही पुरस्कार | पुढारी

GRAMMYs 2024 : जाकिर हुसैन आणि शंकर महादेवन यांना 'ग्रॅमी'; बासुरी वादक राकेश चौरसियांनाही पुरस्कार

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकप्रिय तबलावादक जाकिर हुसैन आणि गायक शंकर महादेवन यांना ग्रॅमी पुरस्कार मिळाला. (GRAMMYs 2024) दोन्हीही लीजेंड्री कलाकारांचे बँड ‘शक्ती’चे अल्बम ‘दिस मोमेंट’ने सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक अल्बमच्या कॅटेगरीमध्ये हा पुरस्कार आपल्या नावे केला आहे. या अल्बममध्ये एकूण ८ गाणी आहेत. (GRAMMYs 2024)

संबंधित बातम्या –

या बँडमध्ये शंकर महादेवन, जॉन मॅकलॉलिन, जाकिर हुसैन, वी सेल्वागणेश आणि गणेश राजगोपालन यासारखे कलाकार एकत्र काम करतात. या बँड शिवाय बासुरी वादक राकेश चौरसिया यांनी देखील दोन ग्रॅमी ॲवॉर्ड आपल्या नावे केले आहेत.

हा संगीताच्या जगतातील दिला जाणारा सर्वात मोठा पुरस्कार आहे. पुरस्कार सोहळ्याचे आयोजन लॉस एंजिल्सच्या क्रिप्टो कॉम एरीनामध्ये केले आहे. या कार्यक्रमात SZA, बिली एलिश, दुआ लिपा, ओप्रा विनफ्रे, मेरिल स्ट्रीपसह अनेक मोठे कलाकार सहभागी झाले.

फ्यूजन बॅड शक्तीने ४५ वर्षांनंतर आपला पहिला अल्बम रिलीज केला. या अल्बमला ग्रॅमी पुरस्कार मिळाला. गिटारिस्ट जॉन मॅकलॉलिनने १९७३ मध्ये भारतीय व्हायोलिन प्लेयर एल. शंकर, तबला वादक जाकिर हुसैन आणि टी. एच. ‘विक्कू’ विनायकराम यांच्यासोबत फ्यूजन बँड ‘शक्ती’ ची सुरुवात केली होती. १९७७ नंतर हा बँड खूप सक्रिय नव्हता.

 

Back to top button