ललित कला केंद्र प्रकरण : प्रायोगिक नाटकाप्रकरणी सत्यशोधन समिती स्थापन.. | पुढारी

ललित कला केंद्र प्रकरण : प्रायोगिक नाटकाप्रकरणी सत्यशोधन समिती स्थापन..

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रामध्ये शुक्रवारी प्रायोगिक नाटकाचे सादरीकरण केले जात होते. या नाटकाप्रसंगी झालेल्या राड्यावरून विद्यापीठाने सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधन समिती स्थापन केली आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर यासंदर्भात नियमानुसार तातडीने आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही करण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

विद्यापीठाने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, विद्यापीठामधील कायदा आणि सुव्यवस्था कोणीही हातात घेऊ नये ही विद्यापीठाची भूमिका आहे. या घटनेमुळे अनेकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असल्याबाबत विद्यापीठाकडे विविध संघटनांकडून निवेदने प्राप्त झाली आहेत. कोणत्याही व्यक्तीचे, महापुरुषाचे तसेच ऐतिहासिक व्यक्तीचे विडंबन करणे हे पूर्णतः गैर असून निषेधार्ह आहे. विद्यापीठ अशा कोणत्याही गोष्टीचे समर्थन करीत नाही. यामध्ये कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर विद्यापीठ दिलगिरी व्यक्त करीत असल्याचेदेखील विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा

 

Back to top button