Tamannaah Bhatia : तमन्ना भाटिया धर्मा एंटरटेनमेंटच्या आगामी प्रोजेक्टमध्ये दिसणार | पुढारी

Tamannaah Bhatia : तमन्ना भाटिया धर्मा एंटरटेनमेंटच्या आगामी प्रोजेक्टमध्ये दिसणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री तमन्ना भाटिया ही आपल्या सिनेसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (Tamannaah Bhatia) वेळोवेळी तमन्नाने तिच्या कामाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. सूत्रांनुसार आता तमन्ना भाटिया धर्मा प्रॉडक्शनच्या धर्माटिक एंटरटेनमेंटच्या डिजिटल विंगसोबत एकत्र येण्यासाठी सज्ज झाली आहे, अशी माहती समोर आली आहे. (Tamannaah Bhatia)

संबंधित बातम्या –

अलीकडे तमन्ना भाटियाने अनोख्या भूमिका साकारून ती उत्तम काम करतेय हे दाखवून दिलं आहे. बबली बाउन्सर, आखरी सच, प्लॅन ए प्लॅन बी, जी कर्दा, आणि लस्ट स्टोरीज २ या सारख्या उत्तमोतम प्रोजेक्ट्सने प्रेक्षकांची मन जिंकली आहे. आगामी काळात ती टिप्सी ड्रामाडीसह आणखी एक वेगळा प्रकार शोधण्यासाठी सज्ज आहे.

संबंधित बातम्या

तमन्ना भाटियाचे हे सहकार्य प्राईम व्हिडिओ इंडियासाठी एक स्टार्टअप ड्रामा असणार आहे. तमन्नाच्या आगामी प्रोजेक्टची प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे. हलक्याफुलक्या चित्रपटाचे दिग्दर्शन अर्चित कुमार करणार असल्याच्या चर्चा आहेत. या आगामी ड्रामामध्ये दोन अभिनेत्री दिसणार असून दुसऱ्या अभिनेत्रीच कास्टिंग सुरू आहे.

सूत्रांनुसार आगामी चित्रपट सध्या प्री-प्रॉडक्शनच्या टप्प्यात आहे. याचे शूटिंग मार्चच्या मध्यात किंवा एप्रिलच्या सुरुवातीला सुरू होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तमन्ना भाटियाने मोठ्या पडद्यावरील चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणे सुरू ठेवले आहे. तिचे Dharmatic Entertainment सोबतचे सहकार्य डिजिटल क्षेत्रातील तिचा चौथा प्रकल्प आहे. याशिवाय अभिनेत्रीकडे तिच्या मार्गाने प्रोजेक्ट्सची प्रभावी लाईनअप आहे. तमन्ना भाटिया जॉन अब्राहमसोबत वेदामध्ये आणि अरनामाई ४ नावाच्या तमिळ प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks)

Back to top button