पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेत्री आणि मॉडल पूनम पांडेच्या मृत्यूच्या वृत्ताने सर्वांनाच धक्क्यात टाकले. सर्व्हायकल कॅन्सरने तिचे निधन झाल्याचे म्हटले जात होते. (Poonam Pandey) आता एका रिपोर्टमध्ये सांगण्यात येत आहे की, पूनम पांडेच्या बहिणीचा पत्ता लागत नाहीये. रिपोर्टमध्ये परिवाराच्या अन्य सदस्यांचे फोनदेखील बंद असल्याचे म्हटले जात आहे. (Poonam Pandey)
सूत्रांच्या माहितीनुसार, पूनम पांडेच्या मृत्यूचे वृत्त व्हायरल होत आहे. तेव्हापासून तिच्या कुटुंबीयांशीदेखील संवाद होत नाहीये. पूनम पांडेशी संबंधित एका जवळच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारच्या सकाळी बहिणीने फोन करून मृत्यूची माहिती दिली होती. तिच्या बहिणीने सांगितलं होतं की, पूनमचा मृत्यू सर्व्हायकल कॅन्सरमुळे झाला होता. त्यानंतर पूनम पांडेच्या टीमने मृत्यूच्या वृत्ताची पुष्टी करत तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडल माहिती शेअर केली होती.
परंतु, आता सूत्रांचे म्हणणे आहे की, पूनम पांडेच्या टीमच्या सदस्य आणि तिच्या परिवाराशी संपर्क होऊ शकलेला नाही. तिच्या बहिणीचा फोन लागत नाही तसेच कुटुंबातील कोणत्याही सदस्यांचा फोन लागत नाही. रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे की, "पूनम पांडेच्या बहिणीशी आमचे सकाळी बोलणे झाले होते. तिनेच मृत्यूची माहिती दिली होती. जेव्हा आम्ही तिच्या बहिणीशी संपर्क साधण्याचा प्रय्तन केला, तेव्ही तिचा फोन स्विचऑफ येत आहे. पूनमच्या परिवाराचे इतर सदस्यांचा फोनदेखील कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहेत. पूनमच्या टीमच्या २-३ लोकांशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा प्रत्येकाचा फोन स्विचऑफ येत होता.
दरम्यान, पूनम पांडेचा अखेरच्या दिवसांतील व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तिचे हास्य पाहुणं अंदाज लावणे कठीण आहे की, ती सर्व्हायकलसारख्या वेदनादायी परिस्थितीतून जात असावी.