Gangubai kathiawadi : घमंडी कशी काय?; सीमा पाहवाने आलिया भट्टविषयी केला खुलासा | पुढारी

Gangubai kathiawadi : घमंडी कशी काय?; सीमा पाहवाने आलिया भट्टविषयी केला खुलासा

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिग्गज अभिनेत्री सीमा पाहवा यांनी ‘गंगुबाई काठियावाडी’ ( Gangubai kathiawadi ) मध्ये आपल्या दमदार अभिनयाने सर्वांची मने जिंकली. २०२२ रोजी चित्रपटात रिलीज झालेल्या या चित्रपटात त्यांनी शीला मौसीची भूमिका साकारली होती. तर आलिया भट्टने गंगुबाई काठियावाडीची भूमिका केली होती. दोघींनीही चित्रपटात एकत्र काम केलं होतं. नुकतेच सीमा पाहवा यांनी आलिया भट्टच्या कामासंबंधी अनेक खुलासे केले आहेत.

संबंधित बातम्या 

‘गंगूबाई काठियावाडी’मध्ये आलिया भट्टसोबत काम

एका मुलाखतीत सीमा पाहवा यांनी म्हटले की, ‘मी या चित्रपटाआधी आलिया भट्ट आणि संजय लीला भन्साळींसोबत काम केलं नव्हतं. पहिल्यांदा मला या चित्रपटामध्ये एकत्र काम करण्याची संधी मिळाली होती.’ आलिया आणि भन्साळी यांची काम करण्याच्या पद्धतीबद्दल काहीच माहिती नव्हते. सीमा पाहवा यांना नेहमी कॉमिक रोलमध्ये पाहण्यात आलं आहे. रिपोर्टनुसार, या चित्रपटाबद्दल सीमा खूप घाबरल्या होत्या की, संजय लीला भन्साळी त्यांना निगेटिव्ह भूमिकेत स्वीकारतील की नाही?.’

आलिया भट्टसोबत काम करण्याचा खूप चांगला अनुभव

‘गंगूबाई काठियावाडी’ Gangubai kathiawadi ) मध्ये आलिया भट्ट मुख्य भूमिकेत होती. या भूमिकेसाठी तिला नॅशनल फिल्म ॲवॉर्डनदेखील सन्मानित केलं होतं. सीमा पाहवाने आलियासोबत काम करण्याचा अनुभव खूप चांगला असल्याचे सांगितले.

या चित्रपटामध्ये मला त्यांच्यासोबत काम करून चांगले वाटले. पण, सुरुवातीला मला आश्चर्य वाटलं होतं की, नवी अभिनेत्री आहे, सक्सेसफुल आहे. पण ती घमंडी कशी काय असू शकते?. या सगळ्याशिवाय आलिया खूप मेहनती, प्रामाणिक आणि तिच्या आई-वडिलांसोबत ज्येष्ठ व्यक्तीचा आदर करणारी आहे. असेही तिने यावेळी सांगितले आहे.

‘या’ चित्रपटात दिसणार आलिया

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, आलिया शेवटची बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहसोबत ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात स्क्रीन शेअर करताना दिसली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भारदस्त कामगिरी केली. यानंतर आलियाच्या अभिनयासोबत तिच्या साड्यांचीही खूप प्रशंसा झाली. सध्या आलिया तिच्या आगामी ‘जिगरा’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 💛 (@aliaabhatt)

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 💛 (@aliaabhatt)

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 💛 (@aliaabhatt)

Back to top button