Kriti Kharbanda : पुलकित-क्रिती खरबंदाचे रोका सेरेमनी फोटो व्हायरल, अंगठी दाखवत... | पुढारी

Kriti Kharbanda : पुलकित-क्रिती खरबंदाचे रोका सेरेमनी फोटो व्हायरल, अंगठी दाखवत...

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडमध्ये आणखी एक लव्ह बर्ड लग्नबंधनात अडकणार आहे. शादी में जरूर आना फेम क्रिती खरबदा आणि बॉलिवूड अभिनेता पुलकित सम्राट यांचा साखरपुडा झाल्याची माहिती समोर आली आहे. (Kriti Kharbanda ) दोघांचे फोटो तसेच कुटुंबीयांसमवेतचे सुंदर क्षणांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पुलकित आणि क्रिती यांच्या हातामध्ये एंगेजमेंट रिंग दिसत आहेत. त्यामुळे दोघांचा साखरपुडा झाल्याचे दिसत आहे. आता दोघेही लग्नबंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे. (Kriti Kharbanda )

संबंधित बातम्या – 

रोका सेरेमनीचे फोटो व्हायरल

एका इन्स्टाग्राम अकाऊंटवर पुलकित – क्रितीच्या रोका सेरेमनीचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. दुसऱ्या फोटोंमध्ये काही मंडळी दिसत असून हे मित्र असावेत, असा अंदाज लावला जात आहे. क्रितीने गोल्डन बॉर्डर रॉयल ब्ल्यू कलरचा अनारकली ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. तिने या ड्रेसवर पीच कलर दुपट्टा परिधान केला आहे. पुलकितने ब्लॅक फ्लोरल प्रिंट व्हाईट कुर्ती परिधान केली आहे. दोघेही आनंदात दिसत असून मित्र आणि कुटुंबासमवेत फोटोसाठी पोझ देताना दिसत आहेत.

कृति खरबंदाने आपल्या अभिनयाची सुरुवात तमिळ चित्रपट बोनीतून केली होती. २००९ मध्ये हा चित्रपट रिलीज झाला होता. त्यानंतर जवळपास एक वर्षानंतर तिने कन्नड चित्रपटांमध्ये डेब्यू केलं. चार वर्षांनंतर तिने बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली होती. तिने इमरान हाशमीचा चित्रपट राज: रीबूटमधून बॉलीवूड डेब्यू केलं होतं. गेस्ट इन लंडन, शादी में जरूर आना, वीरे की वेडिंग, यमला पगला दीवाना फिर से, हाऊसफुल ४ आणि पागलपंती यासारख्या चित्रपटांमध्ये तिने काम केले.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti Kharbanda (@kriti.kharbanda)

 

View this post on Instagram

 

A post shared by Pulkit Samrat (@pulkitsamrat)

Back to top button