हृतिक रोशनने War 2 बदद्ल दिली मोठी अपडेट; ज्यु. एनटीआरची होणार एन्ट्री? | पुढारी

हृतिक रोशनने War 2 बदद्ल दिली मोठी अपडेट; ज्यु. एनटीआरची होणार एन्ट्री?

पुढारी ऑनलाईन डेस्क : हृतिक रोशनचा चित्रपट फायटर चर्चेत असताना वॉर २ विषयी मोठी अपडेट समोर आली आहे. हृतिक रोशनचा वॉर २ बहुप्रतीक्षित चित्रपट आहे. या चित्रपटाचा पहिला भाग २०१९ मध्ये रिलीज झाला होता. डोमेस्टिक आणि वर्ल्डवाईड दोन्ही बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगला बिझनेस केला होता. आता निर्माते वॉर २ मध्ये ॲक्शन ॲडव्हेंचर एका वेगळ्या पातळीवर नेण्याचा प्रयत्न करत आहेत. चित्रपटाचा पहिला भाग सिद्धार्थ आनंदने दिग्दर्शित केला होता. आता वॉर-2 आयान मुखर्जी दिग्दर्शित करत आहेत. हा चित्रपट २०२५ रोजी रिलीज होईल.

संबंधित बातम्या –

रिपोर्टनुसार, एका मुलाखतीत हृतिकने या चित्रपटात ज्युनियर एनटीआरसोबत स्क्रीन शेअर करणार असल्याचे म्हटले.

आयान आणणार नाविन्यता

सिद्धार्थ आनंद आणि आयान मुखर्जी एक वेगळा च्त्रपट आणण्याचा विचार करत आहेत. हृतिक रोशनने एका इंग्रजी वेबसाईटशी बोलताना सांगितले की, त्याची भूमिका पहिल्या कबीर पेक्षा वेगळी असेल.

चित्रपट प्रमोशना दरम्यान एका मुलाखतीत में हृतिक रोशनने चित्रपट वॉर २ विषयी मोठा खुलासा केला आहे. या चित्रपटामध्ये आरआरआर स्टार ज्युनियर एनटीआर विलेन असणार आहे. जेव्हा हृतिक रोशनला या चित्रपटाबद्दल विचारण्यात आले होते, तेव्हा तो म्हणाला होता की, मी केवळ इतकचं सांगू शकतो की, आम्ही सुरुवात करणार आहोत. इतक्या लवकर की, मला श्वास घ्यायला देखील वेळ नसेल.

Back to top button