'12th Fail' ची अभिनेत्री मेधा शंकर रिअल लाईफमध्ये इतकी ग्लॅमरस | पुढारी

'12th Fail' ची अभिनेत्री मेधा शंकर रिअल लाईफमध्ये इतकी ग्लॅमरस

पुढारी ऑनलाईन डेस्क : 12th फेल फेम अभिनेत्री मेधा शंकर रातोरात सुपरस्टार झालीय. या चित्रपटात तिने विक्रांत मेस्सीसोबत अभिनय केला आहे. तुम्हाला माहितीये का, रिअल लाईफमध्येही ती इतकी हॉट आणि ग्लॅमरस आहे. (12th Fail) जाणून घेऊया तिच्याबद्दल. फिल्मफेअर २०२४ मध्ये १२ वी फेल चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे या चित्रपटामधील कलाकार मेधा शंकर आणि विक्रम मेस्सी यांचे कौतुक होताना दिसतेय. (12th Fail)

संबंधित बातम्या –

चित्रपटाच्या दमदार कहाणीने सर्वांचे मन जिंकून घेतलं आहे. या चित्रपटामध्ये श्रद्धा शुक्लाची भूमिका अभिनेत्री मेधा शंकरने साकारलीय. तिने रातोरात लोकप्रियता मिळवलीय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Medha Shankr (@medhashankr)

मेधा शंकर सोशल मीडियावर लोकप्रिय

या चित्रपटाला चांगले यश मिळाले असून मेधा शंकरचे रातोरात नशीब उजळलं आहे. असे म्हटले जात आहे की, तिचे ७ मिलियन फॉलोअर्स रातोरात वाढले आहेत. दमदार अभिनयाने मेधा शंकरने लाखो लोकांच्या मनावर राज्य केलं आहे. रिपोर्टनुसार, १२ वी फेल चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तिचे केवळ २००K फॉलोअर्स होते. आता ते चारपटीने वाढले आहेत.

मेधा शंकरचे वैयक्तिक जीवन

अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर ती सामान्य कुटुंबातील आहे. तिने पुढे शिक्षण घ्यावे, अशी तिच्या घरच्या मंडळीची इच्छा होती. पण तिला शिक्षणासोबत अभिनयात देखील करिअर करायचे होते. तिने इंडस्ट्रीमध्ये करिअर करण्यासाठी आपल्या वडिलांकडे २ वर्षांचा कालावधी मागितला. या चित्रपटाने तिचे पूर्ण आयुष्यचं बदलून गेले, या चित्रपटाला IMDB वर सर्वाधिक रेटिंग मिळाले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Medha Shankr (@medhashankr)

 

View this post on Instagram

 

A post shared by Medha Shankr (@medhashankr)

एका मुलाखतीमध्ये जेव्हा तिला विचारण्यात आले की, तिला कोणत्या अभिनेत्यासोबत काम करायचे आहे? तेव्हा ती म्हणाली की, तिला रणबीर कपूर अभिनय करण्याची इच्छा आहे. आणखी एका मुलाखतीत तिला शाहरुख खान आवडत असल्याचे सांगितले. तिने शाहरुखची सर्व चित्रपटे पाहिल्याचे सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Medha Shankr (@medhashankr)

Back to top button