Freida Pinto : स्लमडॉग मिलेनियर फेम फ्रिडा पिंटोनं दिला गोंडस बाळाला जन्म | पुढारी

Freida Pinto : स्लमडॉग मिलेनियर फेम फ्रिडा पिंटोनं दिला गोंडस बाळाला जन्म

पुढारी ऑनलाईन डेस्क

स्लमडॉग मिलेनियर फेम अभिनेत्री फ्रिडा पिंटो (Freida Pinto) हिने चाहत्यांना गुड न्यूज दिलीय. फ्रिडानं एका गोंडस बाळाला जन्म दिलाय. तिने आपल्या आणि बाळाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. त्यावर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव सुरु आहे.

‘स्लमडॉग मिलेनियर’ चित्रपटामुळं फ्रिडाला आंतरराष्ट्रीय ख्याती मिळाली. भारतीय वंशाची असलेल्या फ्रिडा पिंटोचा देश विदेशात मोठा चाहतावर्ग आहे. फ्रिडानं अॅडव्हेंचर फोटोग्राफर कॉरी ट्रॅन (Cory Tran) सोबत गुपचूप लग्न केलं होतं. आता हे दोघे आई-बाबा बनले आहेत. फ्रिडानं इन्स्टाग्रामवर कॉरी ट्रान सोबत बाळाचा एक फोटो शेअर केलाय. तसेच दुसरा फोटो फ्रिडाचा आहे. त्यात तिने बाळाला घेतलं आहे. विशेष म्हणजे फ्रिडानं ही आनंदाची बातमी पती कॉरीच्या वाढदिनाचं निमित्त साधून दिलीय. ‘Happy Birthday Dada Cory!’ अशी कॅप्शन तिने फोटोला दिलीय.

”तू फक्त एक Dad नाही तर सुपर-डॅड बनल्याचे पाहून मी खूप भावूक झाले आणि मी आंनदाने भरून पावले.” असे फ्रिडानं म्हटलंय. फ्रिडाला स्लमडॉग मिलेनियरमधील भूमिकेमुळे सर्वांधिक प्रसिद्धी मिळाली. तिने ‘ब्लॅक गोल्ड’, ‘तृष्णा’, ‘डेजर्ट डान्सर’, ‘नाईट ऑफ कप्स’, ‘लव सोनिया’, ‘मोगली’ या सारख्या चित्रपटांमध्ये काम केलंय.

फ्रिडानं (Freida Pinto) कोरोना काळात कॉरी ट्रान सोबत लग्न केलं होतं. त्यानंतर तिने जूनमध्ये प्रेग्नंट असल्याची गुड न्यूज दिली होती. आता तिने एका गोंडस बाळाला जन्म दिल्याय.

हे ही वाचा :

 

View this post on Instagram

 

A post shared by Freida Pinto (@freidapinto)

 

View this post on Instagram

 

A post shared by Freida Pinto (@freidapinto)

 

View this post on Instagram

 

A post shared by Freida Pinto (@freidapinto)

 

View this post on Instagram

 

A post shared by Freida Pinto (@freidapinto)

 

View this post on Instagram

 

A post shared by Freida Pinto (@freidapinto)

Back to top button