माधुरी पवारच्या मादक अदांची 'शेल्फी' | पुढारी

माधुरी पवारच्या मादक अदांची 'शेल्फी'

अभिनेत्री माधुरी पवार हिचं नवीन गाणं युट्यूबवर रिलिज झालं आहे. तिच्या दिलखेच अदा, ठेका धराय लावणार्‍या संगीतामुळे यामुळे हे गाणे सध्या युट्यूबवर धमाका करत आहे. शेल्फी काढा हे म्युझिक टाऊनने बनवलेल्या गाण्याला १ दिवसात तीन लाखावर व्ह्यूज मिळाले आहेत.

ग्रामीण बाजाच्या मराठी गाण्यांचा युट्यूबवर चाहता वर्ग निर्माण झाला आहे. मराठी म्युझिक टाऊनने आता शेल्फी काढा हे गाणं आणलं आहे. या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे माधुरी पवार. नृत्यांगणा म्हणून सर्वश्रुत असलेली आणि मराठी मालिकांत महत्त्वाच्या भूमिका साकारणाऱ्या माधुरीने या गाण्यात तिच्या आदांनी धुरळा उडवून दिला आहे.

व्हॉटसअप, सेल्फी हे तरुणाईच्या जिव्ह्याळ्याच्या विषयाभोवती गाण्याचे बोल लिहिलेले आहेत. ठसकेबाज गाणं असल्याने चाहत्यांच्याही ते पसंतीला उतरत आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button