Filmfare : आनंद एल राय यांची रेड कार्पेटवर हजेरी; 'नखरेवाली' स्टारही सोबत | पुढारी

Filmfare : आनंद एल राय यांची रेड कार्पेटवर हजेरी; 'नखरेवाली' स्टारही सोबत

पुढारी ऑनलाईन डेस्क : अंश दुग्गल आणि प्रगती श्रीवास्तव यांनी फिल्मफेअरच्या ग्लॅमरस रेड कार्पेटवर हजेरी लावली होती. (Filmfare) प्रसिद्ध चित्रपट निर्माते आनंद एल राय यांनी नखरेवाली मधील अंश दुग्गल आणि प्रगती श्रीवास्तव या डायनॅमिक जोडीची ओळख फिल्मफेअरच्या रेड कार्पेट वर सगळ्यांना करून दिली. (Filmfare)

संबंधित बातम्या – 

आनंद एल राय प्रोडक्शन कंपनीच्या कलर येलो प्रोडक्शन्सचा आगामी चित्रपट नखरेवाली चित्रपटात अंश दुग्गल आणि प्रगती श्रीवास्तव यांच्या भूमिका असणार आहेत. दोघे फ्रेशर्स आहेत. या दोन्ही नव्या चेहऱ्यांना आनंद एल राय यांनी संधी दिलीय.

आनंद एल राय यांनी इंडस्ट्रीमध्ये त्यांचा कामाची चमक दाखवली आहे. रेड कार्पेट वर अंश आणि प्रगती सोबत आनंद एल राय यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

आनंद एल राय दिग्दर्शित चित्रपट रक्षा बंधन आहे, यामध्ये अक्षय कुमार-भूमी पेडनेकर मुख्य भूमिकेत होते. त्याआधी अतरंगी रे चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. यामध्ये अक्षय, सारा अली खान आणि धनुष यांच्या भूमिका होत्या. २०१८ मध्ये त्यांनी शाहरुखला घेऊन झिरो चित्रपट आणला होता.

Back to top button