Filmfare Awards 2024 : सॅम बहादुर, अॅनिमलसोबत शाहरुखच्या ‘जवान’ नं मारली बाजी; पाहा पुरस्काराची यादी | पुढारी

Filmfare Awards 2024 : सॅम बहादुर, अॅनिमलसोबत शाहरुखच्या 'जवान' नं मारली बाजी; पाहा पुरस्काराची यादी

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरातमधील गांधीनगर येथे ६९ व्या फिल्मफेअर अवॉर्ड्सचे आयोजन शनिवारी (दि. २७ जानेवारी) रोजी करण्यात आलं आहे. या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा ‘सॅम बहादुर’, अभिनेता रणबीर कपूरचा ‘अॅनिमल’ आणि शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाने सर्वोत्कृष्ट अॅक्शनसाठी बाजी मारली आहे. याशिवाय अनेक स्टार्संना यावेळी वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. हा सोहळा रविवारपर्यत चालणार आहे. ( Filmfare Awards 2024 )

संबंधित बातम्या 

काल शनिवारी, निर्माते- दिग्दर्शक करण जोहर, बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर, झरीन खान आणि नुसरत भरुचा यांच्यासह अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी रेड कार्पेटवर थिरकल्या. याच दरम्यान या सोहळ्यातील काहींना यंदाच्या फिल्मफेअर पुरस्काराने (२०२४) गौरविण्यात आलं. यात ‘सॅम बहादूर’, ‘अॅनिमल’ आणि ‘जवान’ चित्रपटानी बाजी मारली.

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या ब्लॉकबस्टर ड्रामा ‘ॲनिमल’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट ध्वनी डिझाईनचा पुरस्कार मिळाला. अभिनेता शाहरुख खानच्या ‘जवान’ला सर्वोत्कृष्ट ॲक्शन चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट व्हीएफएक्स या कॅटेगिरीतील पुरस्कार ‘जवान’ला मिळाला आहे. रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बॅकग्राऊंड स्कोअर आणि सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाईन यासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

‘सॅम बहादुर’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट वेशभूषा, सर्वोत्कृष्ट ध्वनी डिझाईन आणि सर्वोत्कृष्ट निर्मिती डिझाईनचा पुरस्कार मिळाला आहे. तर अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटातील ‘व्हॉट झुमका’ गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार गणेश आचार्य यांना प्रदान करण्यात आला आहे.

याशिवाय विधू विनोद चोप्राच्या ‘१२ वी फेल’ या चित्रपटाला उत्कृष्ट संपादनासाठी फिल्मफेअरमध्ये पुरस्कार मिळाला आहे. हा सोहळा रविवारी (दि. २८ ) रोजी सुरू राहणार आहे. यामुळे आणखीन काही स्टार्संना यंदाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे.

फिल्मफेअर पुरस्कार विजेत्यांची यादी ( Filmfare Awards 2024 )

सर्वोत्कृष्ट ध्वनी डिझाईन – सिंक सिनेमा (अॅनिमल)
सर्वोत्कृष्ट कोरियोग्राफी- गणेश आचार्य (‘व्हॉट झुमका’ गाणे, रॉकी और रानी की प्रेम कहानी)
सर्वोत्कृष्ट वेशभूषा डिझाईन- सचिन लवलेकर, दिव्या गंभीर, आणि निधी गंभीर (सॅम बहादुर)
सर्वोत्कृष्ट अॅक्शन- स्पिरो रजाटोस, एनल अरासु, क्रेग मैक्रे, यानिक बेन, केचा खम्पाकड आणि सुनील रोड्रिग्स (जवान)
सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईन- सुब्रत चक्रवर्ती (सॅम बहादुर)
सर्वोत्कृष्ट संपादन – जसकुंवर सिंह कोहली (12वी फेल)
सर्वोत्कृष्ट बॅकग्राउंड स्कोर- हर्षवर्धन रामेश्वर (अॅनिमल)
सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाईन- कुणाल शर्मा (सॅम बहादुर)
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी- अविनाश अरुण धावरे (थ्री ऑफ अस)
सर्वोत्कृष्ट वीएफएक्स – रेड चिलीज (जवान)

Back to top button