पुढारी ऑनलाईन डेस्क : मेगास्टार अनिल कपूर यांची स्टार पॉवर सलग दोन महिन्यांत बॅक-टू-बॅक हिट्ससह चमकत आहे. (Animal-Fighter Movie ) आता सिनेमा आयकॉन सध्या ओटीटी आणि थिएटर या दोन्हींवर वर्चस्व गाजवत आहे. १ डिसेंबर, २०२३ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. हा ब्लॉकबस्टर चित्रपट "ॲनिमल" आता नेटफ्लिक्सवर पाच भारतीय भाषांमध्ये ऑनलाईन उपलब्ध झाला आहे. (Animal-Fighter Movie)
संबंधित बातम्या –
सोबतीला अनिल कपूर थिएटर्सवरही वर्चस्व गाजवत आहे आणि ग्रुप कॅप्टन राकेश 'रॉकी' जयसिंग म्हणून 'फायटर'साठी चांगलीच प्रशंसा मिळवली आहे. "ॲनिमल"मधील अनिल कपूरची भूमिका अफलातून झाली आहे आणि त्याच्या अभिनयाचं कौतुक देखील झालं आहे. बलबीर सिंग म्हणून सर्वत्र प्रशंसा मिळवत आहे.
दुसरीकडे, सिद्धार्थ आनंदचा 'फायटर' देखील चर्चेत आहे. यामध्ये ग्रुप कॅप्टन राकेश 'रॉकी' जयसिंगच्या दमदार भूमिकेने थिएटर प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत आहे. फायटर हा सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित आणि आनंदच्या मार्फ्लिक्स पिक्चर्सने निर्मित केलेला एरियल ॲक्शन-थ्रिलर आहे. हृतिक रोशन, दीपिका पदुकोण, करण सिंग ग्रोव्हर आणि अक्षय ओबेरॉय यांच्यासोबत कपूर स्टार्स २५ जानेवारी, २०२४ रोजी रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांना भुरळ घालत आहेत.
फायटर पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिस कलेक्शन २४.६० कोटी रुपये झाले. वर्ल्डवाइड पहिल्या दिवशीची कमाई ३५ कोटी रुपये तर परदेशात ८ कोटींचे कलेक्शन होते. भारतात ग्रॉस कलेक्शन २७ कोटींचे होते. मीडिया रिपोर्टनुसार, दुसऱ्या दिवशी चित्रपटाने ३९ कोटींचे कलेक्शन केले होते. एकूण दोन दिवसात देशभरात ६१.५० कोटींचे कलेक्शन केलं आहे.