सलमान खानच्या फार्महाऊसमध्ये घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक | पुढारी

सलमान खानच्या फार्महाऊसमध्ये घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता सलमान खानच्या पनवेल येथील फार्महाऊसमध्ये जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. ४ जानेवारी रोजी ही घटना घडली होती. अजेश कुमार ओमप्रकाश गिल आणि गुरुसेवक सिंग तेजसिंग शीख, अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पनवेल ग्रामीण पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्यापासून त्याची सुरक्षा कडक करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची चूक टाळण्यासाठी त्याला नेहमीच कडक सुरक्षा असते. दरम्यान, गुरूवारी (दि.४) पनवेल येथील अर्पिता फार्महाऊसवर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांना सलमान खानचे चाहते असल्याने त्यांना भेटायचे असल्याचे दोघांनी सांगितले. मात्र, त्यांनी सुरक्षा रक्षकांना खोटी नावे दिली. त्यानंतर त्यांनी सुरक्षा भिंतीवर लावलेल्या तारा कापून फार्महाऊसमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोघांनाही सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्यांना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपींकडून बनावट आधार कार्ड जप्त केले. मात्र या दोघांनीही सलमान खानचे चाहते असल्याचे सांगितले आहे.

हेही वाचा : 

Back to top button