Ayodhya Ram Mandir : विष्‍णू मनोहरांची पाकसेवा; अयोध्येत ५ हजार किलो सूजीचा हलवा करण्याचा संकल्‍प

शेफ विष्णू मनोहर
शेफ विष्णू मनोहर

नागपूर ; पुढारी वृत्‍तसेवा येत्या 22 जानेवारी रोजी होणाऱ्या अयोध्येतील श्री राम मंदिर Ayodhya Ram Mandir लोकार्पण आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने देशाच्या विविध भागात पूर्वतयारी जोरात सुरू आहे. प्रत्येकजण आपल्या वेगवेगळ्या पद्धतीने यात सहभागी होऊ शकतो. या विचाराने उत्साहात आहेत. यात देशाचे ह्रदयस्थल आणि खवय्येगिरीत अग्रनी असलेले नागपूर कसे मागे राहील? नागपूरचे आंतरराष्ट्रीय शेफ विष्णू मनोहर यांनी अयोध्येत पाच हजार किलो सूजीचा हलवा करण्याचा संकल्प केला आहे. अर्थातच 22 रोजी मुख्य सोहळा असल्याने सर्वसामान्यांना अयोध्येत प्रतिबंध आहे. यामुळे 24 ते 26 जानेवारी दरम्यान हे आयोजन अयोध्येत होणार असून, प्रसाद भाविकांना दिला जाणार आहे.

आपण यापूर्वी अयोध्येत कारसेवेसाठी गेलो होतो आता पाकसेवेसाठी जाणार आहोत असेही त्यांनी या निमित्ताने स्पष्ट केले. श्रीराम जन्मभूमी मंदिर Ayodhya Ram Mandir ट्रस्टच्या वतीने न्यासाच्या सहकार्याने हा विश्वविक्रमी हलवा एकाच कढईत तयार होणार असून, यासाठी लागणारी 18 फूट लांबीची भव्य अशी कढई आणि 1000 किलो सूजी नागपुरातून लवकरच रवाना होणार आहे. इतर साहित्य न्यासाच्या वतीने उपलब्ध केले जाणार आहे. यापूर्वी 2100 किलोचा हलवा झालाय आता हा विश्वविक्रम न्यासाच्या नावे नोंदविला जाणार आहे. 1000 किलो साखर, एक हजार किलो शुद्ध तूप जे श्री तिरुपती बालाजी देवस्थानकडून आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. साडेतीनशे किलो विलायची, सुकामेवा आणि दोन हजार लिटर दूध असे साहित्य या हलव्यासाठी वापरले जाणार आहे.

आतापर्यंत 7800 किलो खिचडीच्या विश्वविक्रमासह Ayodhya Ram Mandir तब्बल 20 विक्रम प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या नावावर आहेत. अलीकडे त्यांनी चंद्रपूरला मिलेट्सपासून बनवलेली खिचडी तयार केली. यानंतर नागपुरातही पुन्हा दोन कार्यक्रम होणार आहेत. अशाप्रकारे राज्यात बारा ठिकाणी अशा प्रकारचे मिलेट्सवर आधारित खाद्यपदार्थ आपण करणार असल्याची माहिती विष्णू मनोहर यांनी 'पुढारी'शी बोलताना दिली.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news