RRR फेम Jr NTR सुखरूप! भूकंपानंतर जपानवरून परतला, X वर पोस्ट करत म्हणाला…. | पुढारी

RRR फेम Jr NTR सुखरूप! भूकंपानंतर जपानवरून परतला, X वर पोस्ट करत म्हणाला....

पुढारी ऑनलाईन : २०२४ च्या पहिल्याच दिवशी शक्तिशाली भूकंपाने जपान हादरले. एकामागून एक झालेल्या भूकंपामुळे येथील किमान ८ लोकांचा मृत्यू झाला. सोमवारपासून जपानला सुमारे १५५ भूकंपाचा धक्के बसले आहेत. सुरुवातीला ७.६ तीव्रतेचा धक्का बसला. त्यानंतर भूकंपाचे अनेक धक्के बसले. (Japan earthquake)

संबंधित बातम्या 

दरम्यान, एसएस राजामौली यांच्या ऑस्कर पुरस्कार विजेत्या ‘RRR’ फेम ज्युनियर एनटीआर गेल्या आठवड्यापासून जपानमध्ये सुट्टीचा आनंद घेत होता. दरम्यान, आज २ जानेवारी रोजी ज्युनियर एनटीआरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर (पूर्वीचे ट्विटर) एक पोस्ट शेअर करत, आपण घरी परतल्याचे म्हटले आहे.

त्याने म्हटले आहे की, ‘जपानमध्ये भूकंपामुळे खूप दुःख झाले’. १ जानेवारी रोजी अनेक शक्तीशाली भूकंपाच्या मालिकेने जपान हादरले. ज्यामुळे आठ लोकांचा मृत्यू झाला. त्सुनामीच्या लाटा धडकल्यानंतर हजारो लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

ज्युनियर एनटीआर आणि त्यांचे कुटुंबीय सुट्टीचा आनंद घेण्यासाठी अनेकदा परदेशात जातात. ज्युनियर एनटीआर त्याची पत्नी लक्ष्मी प्रणती आणि त्यांची दोन मुले अभय आणि भार्गव यांच्यासह ख्रिसमस आणि नवीन वर्ष साजरे करण्यासाठी जपानला गेले होते.

Jr NTR ने X वर लिहिले आहे की, “आज जपानहून घरी परतलो. मागील आठवडा तिथे घालवला. या भूकंपामुळे प्रभावित झालेल्या प्रत्येकासाठी मी संवेदना व्यक्त करतो. ते लवकर या धक्क्यातून सावरतील अशी आशा आहे. मजबूत रहा, जपान.”

१ जानेवारी रोजी ज्युनियर एनटीआर, त्यांची पत्नी आणि दोन मुले हैदराबाद विमानतळावर येताना दिसले.

सध्या Jr NTR दिग्दर्शक कोरताला शिवा यांच्या ‘देवरा’मध्ये व्यस्त आहे, जो दोन भागात प्रदर्शित होणार आहे. ख्रिसमस २०२३ आणि नवीन वर्षात त्याने कामातून थोडा ब्रेक घेतला होता. ‘देवरा’ची पहिली झलक ८ जानेवारी रोजी समोर येणार आहे. (Japan earthquake)

Back to top button