Japan Earthquake : भूकंपाच्या १५५ धक्क्यांनी जपानमध्ये मोठी जीवितहानी; १२ ठार | पुढारी

Japan Earthquake : भूकंपाच्या १५५ धक्क्यांनी जपानमध्ये मोठी जीवितहानी; १२ ठार

पुढारी ऑनलाईन डेस्क : नव्या वर्षाच्या पहिला दिवशी जपानला भूकंपाचे जोरदार धक्के बसले. सोमवारपासून बसलेल्या १५५ धक्क्यांमुळे सुनामीच्या लाटांनी जपानसहित कोरिया आणि रशियालाही धडका दिल्या. या भूकंपात आतापर्यंत १२ जणांचा बळी गेला असून, शेकडो जखमी झाले आहेत. हजारो घरांची पडझड झाली असून, काही हजार लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

राजधानी टोकियोपासून सुमारे ३०० कि.मी. (१९० मैल) अंतरावरील नोटो द्वीपकल्पाजवळ सोमवारी झालेल्या ७.६ तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपानंतर जपानने संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर सुनामीचा इशारा जारी केला आहे. इशिकावा येथील नोटोच्या किनारपट्टीवर पाच मीटर उंच लाटा उसळल्या असून, नैसर्गिक आपत्तीमुळे ३३ हजारांहून अधिक घरांतील वीज आणि पाणीपुरवठा खंडित झाला आहे. प्रमुख महामार्गांसह देशभरातील अनेक महत्त्वाचे मार्ग बंद करण्यात आले आहेत, ज्यामुळे डॉक्टर आणि लष्करी जवानांना बचाव सेवा प्रदान करण्यात अडचण येत आहे. सोमवारपासून किमान १५५ भूकंपाचे धक्के बसले आहेत, ज्यात सुरूवातीला ७.६ रिश्टर स्केल तीव्रवतेचे होते, त्यानंतर ६ रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के बसले.

इशिकावाच्या वाजिमा येथील घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. या जबरदस्त भूकंपामुळे अनेक ठिकाणचे रस्ते भेगाळले आहेत. या भूकंपानंतर रशियालाही सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे रशियातही आपत्कालीन यंत्रणेला दक्ष राहण्यास सांगण्यात आले आहे.

हेही वाचा : 

Back to top button