Thalapathy Vijay : विजयकांत यांच्या अंत्यदर्शनावेळी थलापती विजयवर फेकली चप्पल (Video)

Thalapathy Vijay
Thalapathy Vijay

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ इंडस्ट्रीतील दिग्गज कलाकार थलापती विजयवर भर गर्दीत चप्पलेने हल्ला झाला. (Thalapathy Vijay) याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, अभिनेता थलपती विजय अभिनेते कॅप्टन विजयकांत यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचला होता. दरम्यान, भर गर्दीत तो आपल्या गाडीमध्ये बसण्यासाठी पोहोचला तेव्हा कुणीतरी त्याच्यावर चप्पलेने हल्ला केला. (Thalapathy Vijay)

संबंधित बातम्या –

हा प्रकार कॅमेरात कैद झाला. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. बॉडीगार्ड त्यांचे संरक्षण करताना दिसत आहेत. दरम्यान, व्हिडिओत दिसतं की, दुरून चप्पल फेकली जाते, जी विजय थलपतीच्या डोक्याच्या बाजून जाताना दिसते.

सोशल मीडियावर अजित कुमार (Ajith Kumar) च्या एका फॅन क्लबने देखील साऊथ सुपरस्टार विजयवर हल्ल्याच्या प्रकाराची निंदा केली. सोबत कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'आम्ही, अजितचे प्रशंसक, थलपती विजयच्याविरोधात झालेल्या अपमानजनक घटनेची निंदा करतो. कोणीही असो, तो जर आमच्या घरी आला तर आपल्याला त्याचा सन्मान करायला हवं. अभिनेता विजयवर चप्पल फेंकणे अजिबात योग्य नाही. मजबूत राहा विजय. रिपोर्टनुसार, विजय-अजीतचे फॅन्स आपसात भिडले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news