Flash Back 2023 मध्ये इन्स्टाग्रामवर व्हायरल झाली ‘ही’ 5 बॉलीवूड गाणी

2023 Instagram viral songs
2023 Instagram viral songs
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 2023 मध्ये इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेली ही 5 बॉलीवूड गाणी पाहा. 2023 मध्ये इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेली ही 5 बॉलीवूड गाणी पाहा. (Flash Back 2023 ) "हस हस" मधील दिलजीत दोसांझ आणि सियाची डायनॅमिक जोडी: दिलजीत दोसांझने 'हस हस'साठी ग्लोबल सेन्सेशन सियासोबत केलेल्या पार्टनरशिपने इन्स्टाग्रामवर खळबळ माजवली. YouTube वर या व्हिडिओने ४.८८ दशलक्ष व्ह्यूज मिळवून पंजाबी बीट्स आणि सियाच्या कमांडिंग व्होकल्सचे हे फ्युजन हीट ठरलं. (Flash Back 2023 )

संबंधित बातम्या –

अपारशक्ती खुराना यांचे चार्ट-टॉपिंग "कुडिये नी" आणि "तेरा नाम सुनके": अपारशक्ती खुरानाच्या "कुडिये नी"ने इन्स्टाग्रामवर व्हायरल होत सगळ्यांना वेड लावलं. आकर्षक बीट्सने संगीत चार्टमध्ये अव्वल स्थान मिळवले. अपारशक्तीच्या गाण्याला यूट्यूबवर २७ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत आणि नुकतच "तेरा नाम सुनके," या गाण्याने आधीच ४.३८ दशलक्ष व्ह्यूज चा टप्पा पार केला आहे.

शाहरुख खानच " चलेया" : बॉलीवूडचा राजा शाहरुख खान याने त्याच्या ब्लॉकबस्टर चित्रपट जवानमधील "चलेया" या गाण्याने प्रेक्षकांची मन जिंकली. अनिरुद्ध रविचंदरचे संगीत आणि कुमार यांच्या गीतांसह अरिजित सिंग आणि शिल्पा राव यांनी हे भावनिक सादरीकरण केलं आहे. नॉस्टॅल्जिया आणि कौतुकाची एक अनोखी पर्वणी देणार हे गाणं आहे. उल्लेखनीय म्हणजे या गाण्याने YouTube वर २४९ दशलक्ष दृश्ये मिळवली आहेत.

विकी कौशलच "तेरे वास्ते": विकी कौशलने त्याच्या जरा हटके जरा बचके या चित्रपटातील "तेरे वास्ते" च्या सादरीकरणाने इंस्टाग्रामवर जोरदार चर्चा रंगली. शादाब फरीदी आणि अल्तमश फरीदी यांच्या कोरससह वरुण जैन यांनी गायलेले हे गाणे आणि सचिन- जिगर यांच्या संगीताला यूट्यूबवर ३१३ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत आणि अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिलेल्या आहेत.

रणवीर सिंगचा ग्रूवी "व्हॉट झुमका": रणवीर सिंगच्या "रॉकी ​​और रानी की प्रेम कहानी" मधील "व्हॉट झुमका" या गाण्याला इंस्टाग्रामवर २२२ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओमधील त्याचा दमदार नृत्य व्हायरल झाला. वापरकर्त्यांनी अनेक रील्स तयार केल्या. या बॉलीवूड गाण्यांनी २०२३ मध्ये केवळ इंस्टाग्रामवर कल्ला केला नाही तर कब्जा प्रेक्षकांच्या मनात देखील घर केलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news