Kaata Kirr New Song : काळजाचा ठाव घेणारं ‘काटा किर्र’ गाणे भेटीला (video)

Kaata Kirr New Song : काळजाचा ठाव घेणारं ‘काटा किर्र’ गाणे भेटीला (video)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : एकविरा म्युझिक प्रस्तुत 'लावण्यवती' या अल्बममधील 'गणराया', 'करा ऊस मोठा','लावा फोन चार्जिंगला' या तीनही गाण्यांना संगीतप्रेमींना प्रचंड प्रतिसाद दिल्यानंतर आता या अल्बममधील 'काटा किर्र' हे अखेरचे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'लावणी नाही… कापणी' या टॅगलाईननुसार या गाण्यातूनही आपल्या लोककलेचे दर्शन घडणार आहे. ( Kaata Kirr New Song )

संबंधित बातम्या 

अवधूत गुप्ते यांनी शब्दबद्ध केलेल्या आणि संगीत दिलेल्या 'काटा किर्र' या गाण्याला मुग्धा कऱ्हाडेच्या ठसकेबाज आवाज लाभला आहे. तर अभिनेत्री पूर्वा शिंदेच्या बहारदार नृत्याला ऋषी देशपांडेची साथ लाभली आहे. त्यामुळे यात अधिक रंगत आली आहे. 'काटा किर्र'चे नृत्य दिग्दर्शन 'सुंदरीकार' आशिष पाटील यांचे असून चैतन्य पुराणिक यांनी याचे छायाचित्रीकरण केले आहे. नुकतेच या गाण्याचा प्रोमो भेटीला आला आहे.

'लावण्यवती' अल्बमबद्दल अवधूत गुप्ते म्हणला की, "आपल्या महाराष्ट्राची लोककला जपली पाहिजे, यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो आणि म्हणून तुमच्यासाठी 'लावण्यवती' या अल्बममधील 'काटा किर्र' हे चौथे आणि शेवटचे गाणे तुमच्या भेटीला आणले आहे. हे गाणे धमाल उडवून देणारे आणि प्रत्येकाला आवडेल अशी आहे." ( Kaata Kirr New Song )

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news