पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता आणि डीएमडीके प्रमुख कॅप्टन विजयकांत यांच्या पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. यावेळी दर्शनासाठी चाहत्यांची गर्दी उसळली. सार्वजनिक श्रद्धांजलीसाठी कोयम्बेडू कार्यालयातून आयलँड ग्राऊंड, अन्ना सलाई येथे पार्थिव आणण्यात आले. विजयकांत यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी थलापती विजय पोहोचला. यावेळी तो १० सेकंद स्तब्ध राहिला.
video – STER_Vino 2.O x वरून साभार
संबंधित बातम्या –
चित्रपट अभिनेते, DMDK प्रमुख विजयकांत यांचे गुरुवारी (२८ डिसेंबर) रोजी वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झाले होते. विजयकांत कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर चेन्नईतील एका रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. विजयकांत यांना चेन्नईतील MIOT हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं.
कॅप्टन विजयकांत यांच्या निधनाबद्दल अभिनेते रजनीकांत म्हणाले, "विजयकांतसारखा चांगला माणूस आम्हाला कधीच मिळणार नाही. राजकारण आणि चित्रपटसृष्टीत त्यांच्यासारखा कोणीही नाही. हे नुकसान कधीही भरून न येणारे आहे." ते चेन्नई विमानतळावर दाखल झाले, त्यावेळी ते बोलत होते.
साऊथ स्टार विजय थलापतीदेखील विजयकांत यांच्या दर्शनासाठी पोहोचला. यावेळी तो विजयकांत यांच्या पार्थिवाजवळ पाहत स्तब्ध राहिला. यावेळी तो खूप भावूक झालेला दिसला.
tweet – RENGASAMY x वरून साभार