Aankh Micholi TV Serial : सासू-सुनेची नवी ‘आँख मिचोली’ मालिका लवकरच

आँख मिचोली
आँख मिचोली

पुढारी ऑनलाईन डेस्क : खुशी दुबे आणि नवनीत मलिक यांची भूमिका असलेली 'आँख मिचोली एका गुप्त पोलिसाची कथा असेल. (Aankh Micholi TV Serial ) 'स्टार प्लस' वाहिनीने नव्या गुप्त पोलिसाच्या कथेवर आधारित 'आँख मिचोली' या मालिकेची घोषणा केली आहे. शशी सुमीत प्रॉडक्शन्स निर्मित, 'आँख मिचोली' मालिका आहे. (Aankh Micholi TV Serial)

संबंधित बातम्या –

'आँख मिचोली'च्या निर्मात्यांनी या पोलीस नाट्यावर आधारित मालिकेचा एक वेधक प्रोमो प्रदर्शित केला आहे. या 'प्रोमो'त रुक्मिणी (खुशी दुबे) एकीकडे गुंडांशी लढणारी गुप्त पोलिस म्हणून दाखवण्यात आली आहे आणि दुसरीकडे, लग्न करून स्थिरस्थावर होण्यासाठी रुक्मिणीचे कुटुंब तिला भाग पाडत असतात आणि आपण प्रतिष्ठित अधिकारी व्हावे, अशी रुक्मिणीची मनापासून इच्छा आहे. ही खरोखरीच एक अतिशय रंजक कथा आहे, जी समाजाचे आणखी एक वास्तव अधोरेखित करेल. 'आँख मिचोली' ही सासू-सुनेची एक अनोखी कथा आहे. रुक्मिणीचा अनोख्या वाटेवरचा प्रवास आणि ती तिची उद्दिष्टे कशी साध्य करते हे पाहणे वेधक ठरेल की लग्नामुळे तिचे आयपीएस अधिकारी होण्याचे पंख छाटले जातील, हे लवकरच प्रेक्षकांना स्पष्ट होईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Khushi Dubey (@_khushidubey_)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news