Sangli Jilha Bank : सांगली जिल्ह्यातील मतपत्रिका एकत्र करूनच मतमोजणी होणार | पुढारी

Sangli Jilha Bank : सांगली जिल्ह्यातील मतपत्रिका एकत्र करूनच मतमोजणी होणार

सांगली : पुढारी वृत्तसेवा

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूकीत मतदारानी कोणत्याही आमिषाला दबावाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे. कोणी कोणाला मतदान केले, प्रत्येक तालुक्यात कोणत्या उमेदवाराला किती मते पडली याची माहिती समजणार नाही. मतदारांची गोपनियता पाळली जाणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांनी सांगितले. (sangli jilha bank)

जिल्हा बँकेच्या निवडणूकीसाठी रविवारी मतदान होत आहे. विकास सोसायटी गट सोडून अन्य गटातील उमेदवारांना जिल्ह्यातून मतदान होणार आहे.

या गटातील उमेदवारांने प्रत्येक तालुक्यात किती मतदान झाले याची माहिती मजमोजणीत समजणार असल्याचे सांगत काही उमेदवारांकडून मतदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे.

पतसंस्था, प्रक्रिया, ओद्यागीक, गृहनिर्माण, मजूर, बँका या सहकारी संस्थातील मतदारांची प्रत्येक तालुक्यात मर्यादीत संख्या आहे.

sangli jilha bank : मतमोजणी वेळी सर्व मतपत्रिका एकत्र करून त्याचे गठ्ठे बांधले

त्यामुळे तालुक्यातून मतदान उमेदवार निहाय समजल्यास कोणत्या संस्था गटातून कोणाला किती मतदान झाले हे उघड होणार असल्याची भिती निर्माण करून अशा संस्थातील मतदारांवर दबाव टाकला जात आहे.

याबाबत बोलताना निवडणूक निर्णय अधिकारी निळंकठ करे म्हणाले, गट अ मध्ये त्या त्या तालुक्यातील संस्था मतदार मतदान करणार आहे.

मात्र महिला राखीव, अनुसुचित जाती जमाती, ओबीसी व भटक्यात जाती जमाती या मतदार संघासह गट क १ ते ४ मधील उमेदवारांना पूर्ण जिल्ह्यातील संस्था मतदार मतदान करणार आहेत.

मतमोजणी वेळी या गटातील सर्व मतपत्रिका एकत्र करून त्याचे गठ्ठे बांधले जाणार आहे. नंतर ते टेबलनिहाय मोजले जाणार आहेत.

जिल्ह्यातील सर्वच मतपत्रीका एकत्र होणार असल्याचे विकास सोसायटी सोडून अन्य गटातील कोणत्याही उमेदवारास कोणत्या तालुक्यातून, कोणत्या संस्था गटातून किती मतदान झाले हे कळणार नाही. जिल्ह्यातीत एकूण मतपत्रिकांची मोजणी होणार आहे. त्यामुळे मतदारांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्भय वातावरणात मतदान करावे. मतदरांची गोपनीयता शंभर टक्के पाळली जाणार आहे.

मतदान दाखवल्यास, मतपत्रीका बाद

निळकंठ करे म्हणाले, मतदान केंद्रात मतदारांची मतदान करताना पुर्ण पणे गोपनियता बाळगली पाहिजे. मतदाराकडून गोपनियतेचा भंग करत मतपत्रीका केंद्रातील अन्य कोणाला दाखवण्याचा प्रकार झाल्यास ती मतपत्रीका केंद्राध्यक्षांकडे जमा करण्यात येणार आहे. अशी मतपत्रीका मतदान पेटीत टाकली जाणार नाही. हे मत बाद करण्यात येणार आहे. गोपनियमात भंग होवू नये यासाठी प्रत्येक मतदान केंद्रात व्हिडीओ कॅमेरे लावण्यात येणार आहेत.

Awade and Mahadik : विधानपरिषद निवडणूक प्रचारादरम्यान प्रकाश आवाडे आणि महादेवराव महाडिक यांच्यातील व्हिडिओने खळबळ

Back to top button