Shrenu Parikh : मराठमोळ्या जोडीदारासोबत ‘ही’ अभिनेत्री अडकली लग्नबंधनात

Shrenu Parikh
Shrenu Parikh

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्रेनू पारीख (Shrenu Parikh) विवाहबंधनात अडकली. श्रेनूने मराठमोळा प्रियकर अक्षय म्हात्रेसोबत (Shrenu Parikh) सप्तपदी घेतली. २१ डिसेंबर रोजी तिने सात फेरे श्रेनूचे मूळ गाव वडोदरा येथे पार पडले. गुजराती आणि महाराष्ट्रीयन रिती-रिवाजानुसार, श्रेनु -अक्षयने लग्नगाठ बांधली.

संबंधित बातम्या –

यावेळी फ्लोरल डिझाईन वाला एक सुंदर लाल आणि ऑरेंज कलर गुजराती लहेंगा परिधान केला होता. अक्षयने रेड कलरची शेरवानी परिधान केली होती. क्रिम-टोन पगडी त्याने घातली होती. श्रेनूने फोटो कॅप्शनमध्ये लिहिलं- 'टेकन फॉरेव्हर' 21/12/23 दोघांनीही आपल्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.

श्रेनुने लग्नाच्या एक दिवस आधी साखरपुडा केला होता. त्यावेळी तिने पर्पल कलरचा लहेंगा परिधान केला होता. त्यावर डायमंड ज्वेलरी होती. तर अक्षयने व्हाईट कलरचा टक्सीडो घातला होता.

श्रेनू पारीख ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री असून ती 'इश्कबाज' मालिकेतून लोकप्रिय झाली. यामध्ये तिने गौरीची भूमिका साकारली होती. पुढे 'एक भरम सर्वगुण संपन', 'इस प्यार को क्या नाम दूं – एक बार फिर', 'घर एक मंदिर', 'जिंदगी का हर रंग…गुलाल' मध्ये काम केले आहे. तर अक्षयने 'पिया अलबेला' आणि 'इंडियावाली माँ' मालिकेत काम केले आहे.

श्रेनु पारिख-अक्षय म्हात्रेची लव्ह स्टोरी २०२१ मध्ये सुरु झाली होती. दोघेही टीव्ही शो 'घर एक मंदिर'च्या सेटवर भेटले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news