Fighter Song : हृतिक- दीपिकाच्या ‘फायटर’ चं ‘इश्क जैसा कुछ’ दुसरं गाणं रिलीज | पुढारी

Fighter Song : हृतिक- दीपिकाच्या 'फायटर' चं 'इश्क जैसा कुछ' दुसरं गाणं रिलीज

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण आगामी ‘फायटर’ या चित्रपट पुढच्या वर्षी २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या धमाकेदार चित्रपटाचा टिझर आणि पहिलं गाणं याआधीच रिलीज झाले आहे. आता चित्रपटातील दुसरे गाणे ( Fighter Song ) चाहत्यांच्या भेटीस आले आहे.

संबंधित बातम्या 

अभिनेता हृतिक आणि दीपिका याच्या आगामी ‘फायटर’ चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटातील ‘शेर खुल गए’ हे पहिले गाणे आणि धमाकेदार टिझर रिलीज झाला होता. आता निर्मात्यांनी चित्रपटातील दुसरे गाणे ( Fighter Song ) रिलीज केलं आहे. या गाण्याचे बोल ‘इश्क जैसा कुछ’ असे आहेत. गाण्यात ऋतिक रोशन आणि दीपिकाची हॉट केमिस्ट्री पाहायला मिळाली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी केलं आहे.

‘इश्क जैसा कुछ’ हे गाणे विशाल, शेखर, शिल्पा राव आणि मेलो डी यांनी गायिले आहे. तर विशाल आणि शेखर या जोडीने गाण्याला संगीत दिलं आहे. गाणे गीतकार कुमार यांनी लिहिले आहे. हे गाणे समुद्र किनाऱ्यावर शूट करण्यात आलं असून, या गाण्यात हे कपल खूपच मौजमस्ती करताना दिसत आहे. गाण्याच्या व्हिडिओमध्ये हृतिकच्या शरीरवृष्टीने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे, तर दीपिका पादुकोण यावेळी खूपच हॉट दिसत आहे. हे गाणे रिलीज झाल्यानंतर अवघ्या काही तासांत ५ लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहे.

सिद्धार्थ आनंदच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘फायटर’ हा चित्रपट पुढील वर्षी २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात हृतिक आणि दीपिकासोबत अनिल कपूर, करण सिंग ग्रोव्हर, अक्षय ओबेरॉय, संजीदा शेख हेही कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

 

View this post on Instagram

 

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

 

View this post on Instagram

 

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

 

View this post on Instagram

 

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

Back to top button