पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस महाठग सुकेश चंद्रशेखरशी संबंधित २०० कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चर्चेत आहे. ईडीने तिच्या विरोधात सप्लीमेंट्री चार्जशीट दाखल केलीय. (Jacqueline Fernandez ) आता अभिनेत्रीने या फ्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतलीय. तिने दावा केला आहे की, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची तिला कोणतीही माहिती नाही. (Jacqueline Fernandez )
जॅकलीनने जी याचिका दाखल केली आहे, त्यामध्ये तिने म्हटलंय की, तिने मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित पीएमएलए २००२ अंतर्गत कोणताच गुन्हा केलेला नाही आणि कोणत्यही प्रकारच्या गुन्ह्यात सहभागी होती.
जॅकलीनच्या याचिकेत हेदेखील म्हटले गेले आहे ती, ईडीने जे पुरावे सादर केले आहेत, त्यावरून सिद्ध होते की, अभिनेत्री निर्दोष आहे आणि सुकेशने तिला बळीचा बकरा बनवला आहे. सुकेश स्वत: ला एख मोठा बिझनेसमन सांगून जॅकलीनला फसवलं होतं.
संबंधित बातम्या –