rohit saraf
rohit saraf

Mismatched Season 3 चा पहिला फोटो रोहित सराफकडून रिलीज

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मिसमॅच्ड सीझन 3 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Mismatched Season 3) अभिनेता रोहित सराफने पहिला फोटो पोस्ट करून चाहत्यांना खुशखबर दिली. रोहित सराफ आणि प्राजक्ता कोळी या कलाकारांनी चाहत्यांना पुढच्या सीजन येणार असल्याची एक झलक दाखवली आहे. (Mismatched Season 3)

संबंधित बातम्या –

चर्चा मिसमॅच्ड सीझन ३ ची

रोहित सराफने सोशल मीडिया वर काही खास फोटो पोस्ट करून त्याचा चाहत्यांना खुश खबर दिली आहे आणि लवकरच मिसमॅच्ड 3 येणार असल्याची एक झलक दाखवली आहे. चर्चेत असलेल्या या वेब सीरिजसाठी सगळेच उत्सुक असताना आता याचा तिसरा सीजन येणार असल्याचं कळतंय.

दिग्दर्शक आकर्ष शर्मासह या तिघांनी एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. आता लवकरच मिसमॅच्ड 3 चा सीजन येणार आहे. चाहत्यांची आवडती वेब सीरिज मिसमॅच्ड ३ ही सुरुवातीपासूनच चर्चेत असलेली सीरिज आहे. सुरुवातीच्या दोन सीझनमध्ये रोहित सराफचे पात्र ऋषी सिंग शेखावत याने प्रेक्षकांना आपलेसे केले आहे.

रोमान्स आणि विनोद यांचा अनोखा अंदाज यातून अनुभवयाला मिळाला होता. सीझन 3 ची उत्सुकता बघायला मिळत असून हास्य, प्रेम आणि अप्रत्याशित ट्विस्टने भरलेल्या मिसमॅच्डच्या मनमोहक दुनियेत पुन्हा प्रवेश करण्यास सगळेच उत्सुक आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news