Prabhas Salaar Movie : एसएस राजामौली यांनी घेतले सालारचे पहिले तिकीट | पुढारी

Prabhas Salaar Movie : एसएस राजामौली यांनी घेतले सालारचे पहिले तिकीट

पुढारी ऑनलाईन डेस्क : सालारच्या चित्रपटाच्या रिलीजची तारीख जवळ येत आहे, तसतशी सालार: पार्ट १ – सीझफायरसाठी उत्साह निर्माण होत आहे. (Prabhas Salaar Movie ) आता या यादीत दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचेही नाव जोडले गेले आहे. सालार: पार्ट १ – सीझफायर लोकांमध्ये असलेला उत्साह स्पष्टपणे दिसत असल्याने, दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांनी ‘सालार’चे पहिले तिकीट विकत घेऊन आनंद व्यक्त केलाय. (Prabhas Salaar Movie)

संबंधित बातम्या –

सालारच्या प्रवासातील हा खरोखरच एक उल्लेखनीय टप्पा आहे. कारण महान दिग्दर्शक एस. एस. राजामौली, ॲक्शन दिग्दर्शक प्रशांत नील, पॅन इंडियाचा स्टार प्रभास आणि प्रचंड प्रतिभावान पृथ्वीराज सुकुमारन यांच्यासोबत चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्याची उत्सुकता खरोखरच वाढली आहे.

होम्बले फिल्म्स निर्मित, सालार: भाग १ सीझफायर चित्रपट निर्माते प्रशांत नील यांनी दिग्दर्शित केला आहे आणि यात प्रभास, श्रुती हासन, पृथ्वीराज सुकुमारन आणि जगपती बाबू आहेत. हा चित्रपट २२ डिसेंबरला चित्रपटगृहामध्ये दाखल होणार आहे.

Back to top button