लोकेश कनगराजने ‘या’ कारणाने घेतला ब्रेक; शाहरुखने नाकारला रजनीकांतचा ‘Thalaivar 171’ | पुढारी

लोकेश कनगराजने 'या' कारणाने घेतला ब्रेक; शाहरुखने नाकारला रजनीकांतचा 'Thalaivar 171'

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिग्दर्शक लोकेश कनगराज यांनी साऊथ स्टार रजनीकांतसोबत आगामी ‘थलायवर १७१’ ( Thalaivar 171 )  चित्रपटासाठी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला अप्रोच केलं होतं मात्र, शाहरूखने काही कारणाने चित्रपट सहभागी होण्यास नकार दिला. तर दुसरीकडे ‘लिओ’ चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक लोकेश कनगराजने त्याच्या नव्या चित्रपटाची जोरदार तयारी सुरू केली आहे. दरम्यानच काही दिवस सोशल मीडियापासून ब्रेक घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. आता याचे खास कारण समोर आले आहे.

संबंधित बातम्या 

दिग्दर्शक लोकेश कनगराज यांनी त्याच्या एक्स (x) टविटरवरून सोशल मीडियापासून ब्रेक घेण्याचे कारण सांगितले आहे. यात ‘लिओ’ चित्रपटाच्या यशानंतर आता आगामी ‘फाईट क्लब’ या नव्या चित्रपटात बिझी आहे. मला नवीन प्रोजेक्टवर लक्ष केंद्रित करायचे असल्याने काही काळ सोशल मीडियापासून दूर राहत आहे. असे त्यांनी म्हटलं आहे.

या कारणाने सोशल मीडियापासून घेतला ब्रेक

लोकेश कनगराज यांनी त्याच्या पोस्टमध्ये, ‘G Squad बॅनरखाली माझे हे पहिले सादरीकरण होते आणि त्यासाठी मी सदैव ऋणी राहीन. मी सांगू इच्छीतो की, मला फक्त माझ्या पुढील प्रोजेक्टवर लक्ष केंद्रित करायचे आहे, आणि म्हणून मी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि माझ्या मोबाईलमधून ब्रेक घेत आहे. या काळात तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकणार नाही. प्रेक्षकांच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो. माझ्या पदार्पणापासूनच त्यांनी मला खूप प्रेम दिलं आहे. तुमची काळजी घ्या.’ असे लिहिले आहे.

लोकेश कनागराज सध्या साऊथ स्टार रजनीकांतसोबत ‘थलायवर १७१’ चित्रपटात बिझी आहेत. दरम्यान ते लेखकांच्या टीमसोबत चित्रपटाच्या स्क्रिप्टवर सध्या जोरदार काम करत आहेत. हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीस येत आहे.

शाहरुखने नाकारला ‘थलायवर १७१’

‘पिंकविला’ च्या रिपोर्टनुसार, लोकेश कनागराजला ‘थलायवर १७१’ ( Thalaivar 171 ) चित्रपटामध्ये अभिनेता शाहरुख खानला कास्ट करायचे होते. त्यानी शाहरुखला चित्रपटाची स्क्रिप्टदेकील वाजून दाखविली होती. यानंतर शाहरुखला हा प्रोजेक्ट खूपच आवडला होता. पण त्याने नम्रपणे या चित्रपटात काम करणार नसल्याचे सांगितले.

Back to top button