Chennai Flood : रजनीकांत यांच्या गार्डन हाऊसमध्ये पुराचे पाणी शिरले (Video Viral) | पुढारी

Chennai Flood : रजनीकांत यांच्या गार्डन हाऊसमध्ये पुराचे पाणी शिरले (Video Viral)

पुढारी ऑनलाईन डेस्क : मिचॉन्ग वादळानंतर झालेल्या मुसळधारमुळे चेन्नई आणि साऊथच्या राज्यांमध्ये पूर आलेला दिसतो. (Chennai Flood ) दरम्यान, चेन्नईतील पुराचे पाणी साऊथ सुपरस्टार थलैवा रजनीकांत यांच्या पोएस गार्डन घरामध्ये शिरले. याचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून रजनीकांत आणि त्यांचे कुटुंबीय चेन्नईतून बाहेर शिफ्ट झाले आहेत. (Chennai Flood )

संबंधित बातम्या –

वादळाने तामिळनाडू आणि आजूबाजूच्या परिसरात पूरस्थितीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले आहे. यामध्ये सुपरस्टार रजनीकांत यांच्या घारतही पाणी शिरले.

चेन्नईतील पॉश परिसरात रजनीकांत यांचे पोएस गार्डन असणारे घर आहे. याचा एक व्हिडिओदेखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. पण, त्यावेळी रजनीकांत घरात नव्हते. हा व्हिडिओ एका फॅनने शूट केला आहे.

रजनीकांत यांचे कुटुंबीय दुसऱ्या जागी शिफ्ट

रिपोर्ट्सनुसार, रजनीकांत आता चेन्नईतून बाहेर आहेत. ते Tirunelveli मध्ये असून नवा चित्रपट Thalaivar 170 चे शूटिंग करत आहेत. हा चित्रपट टीजे ज्ञानवेल दिग्दर्शित करत आहेत.

video – Shashank Singh,

Back to top button