Rajinikanth : साऊथच्या चित्रपटांची मांदियाळी, रजनीकांत यांच्या थलाइवर 171 ची घोषणा | पुढारी

Rajinikanth : साऊथच्या चित्रपटांची मांदियाळी, रजनीकांत यांच्या थलाइवर 171 ची घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथचा सुपरस्टार रजनीकांत अलीकडच्या जेलर चित्रपटात तमन्ना भाटियासोबत दिसला होता. त्याच्या चाहत्यांना हा चित्रपट खूप आवडला. प्रेक्षकांसह अनेक स्टार्सनी चित्रपटाचे आणि रजनीकांत यांच्या अभिनयाचे कौतुक केले. आता सर्वांच्या नजरा त्यांच्या पुढच्या चित्रपटाकडे लागल्या आहेत. (Rajinikanth) आता रजनीकांत प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. (Rajinikanth) त्याच्या पुढील चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. सोशल मीडियावर रजनीकांतच्या पुढील चित्रपटाची घोषणा करण्यात आली. सोशल मीडियावर ‘थलाइवर 171’ ची घोषणा होताच तो ट्रेंडमध्ये येऊ लागला.

रजनीकांत यांच्या चित्रपटात ते लोकेश कनगराजसोबत काम करणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती. आता निर्मात्यांनीच याची घोषणा केली आहे. सन पिक्चर्सने सोशल मीडियावर रजनीकांत यांच्या आगामी ‘थलाइवर 171’ चित्रपटाची घोषणा केली आहे.

अनिरुद्ध रविचंदर रजनीकांत यांच्या नवीन चित्रपटाला (जवान संगीत दिग्दर्शक) संगीत देणार आहेत. प्रॉडक्शन हाऊसने जारी केलेल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “सुपरस्टार रजनीकांतच्या थलाइवर 171 ची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. लोकेश कंगराज यांनी हे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. याचे संगीत अनिरुद्ध रविचंदर यांनी दिले आहे, तर अनबरीव स्टंट मास्टर बनणार आहे.”

नुकताच लोकेश कंगराजचा आणखी एक चित्रपट साऊथचा सुपरस्टार थलपती विजयसोबत येणार आहे. या चित्रपटाला लिओ असे नाव देण्यात आले असून, या चित्रपटात बॉलिवूडचा सुपरस्टार संजय दत्तही दिसणार आहे.

Back to top button