Aishwarya Rai Deep fake Video : ब्ल्यू बिकिनीत ऐश्वर्या रायचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल

Aishwarya Rai Deepfake photo
Aishwarya Rai Deepfake photo

पुढारी ऑनलाईन डेस्क : रश्मिका मंदाना, आलिया भट्ट नंतर आता ऐश्वर्या राय बच्चनचा ब्ल्यू बिकिनीतील डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. (Aishwarya Rai Deep fake Video) नेटिझन्स म्हणाले, एआय मॅजिक, खूपच धोकादायक. ऐश्वर्या रायचा व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ती ब्ल्यू कलरच्या स्वीमसूटमध्ये दिसते. ती पुलामध्ये एन्जॉय करताना दिसते. हा व्हिडिओ मॉर्फ करण्यात आला आहे. ती कॅमेराकडे बघून हसताना दिसतेय. पण व्हिडिओ अधिकृत आहे की नाही, हे समजत नाही. (Aishwarya Rai Deep fake Video)

हा डीपफेक व्हिडिओ आर्टिफिशियल इंटेलिजेन्स (एआय) तंत्रज्ञानाने बनवण्यात आला आहे. रश्मिका मंदानाचा एक खोटा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाल्यानंतर डीपफेकचे तंत्रज्ञान अधिक प्रखाशझोतात आले. नेटिजन्सने दावा केला आहे की, व्हिडिओशी छेडछाड करण्यात आलीय. वास्तविक हा व्हिडिओ ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एक भारतीय वंशाच्या व्यक्तीचा आहे.

याचप्रकारे काजोल, आलिया भट्ट आणि कृती सेनॉनचा देखील व्हिडिओ, फोटो व्हायरल झाला होता.

संबंधित बातम्या – 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news