‘फायटर’ च्या यशासाठी Deepika Padukone नं घेतलं बालाजीचं दर्शन; कॅज्युअल लूक व्हायरल

Deepika Padukone
Deepika Padukone
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण ( Deepika Padukone ) सध्या तिच्या आगामी अॅक्शन थ्रिलर चित्रपट 'फायटर' मुळे चर्चेत आहे. नुकताच चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित होताच चाहत्याच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटात हृतिक रोशन आणि दीपिकाची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. चित्रपट रिलीज होण्याच्या आधी दीपिका तिच्या बहिणीसोबत तिरूपती बालाजीचे (भगवान व्यंकटेश्वर ) दर्शन घेतले आहे. यावेळचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ( Deepika Padukone )

संबंधित बातम्या 

अभिनेत्री दीपिका पादुकोण ( Deepika Padukone ) आणि तिची बहीण अनिशा पादुकोणसोबत आंध्रप्रदेश येथील तिरूपती बालाजीच्या मंदिराला भेट दिली. येथील भगवान वेंकटेश्वराचे दर्शनासोबत आशीर्वाद घेतला. यादरम्यान दीपिकाने ब्लॅक रंगाचा को-ऑर्डर सेट परिधान केला होता. तर अनिशा केसरी रंगाच्या कपड्यात दिसली. यावेळी दोधांही अगदी साध्या वेशभूषेत दिसल्या.

याशिवाय व्हिडिओत मंदिरातील परिसर, मंदिराच्या पायऱ्या आणि सुरक्षा व्यवस्थाही दिसत आहे. दीपिकाने आगामी 'फायटर' चित्रपटाच्या यशासाठी बालाजीकडे प्रार्थना केली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी तिचे भरभरून कौतुक केलं आहे. तर दुसरीकडे तिच्या आगामी 'फायटर' चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

सिद्धार्थ आनंद यांनी 'फायटर' चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. Viacom18 Studios आणि Marflix Pictures यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. अभिनेता हृतिक रोशन आणि दीपिका पहिल्यांदाच चित्रपटात एकत्रित स्किन शेअर करणार आहेत. हा चित्रपट ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त म्हणजे, २५ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. 'फायटर' शिवाय दिपिकाकडे बॉलिवूड अभिनेता अजय देवगणसोबतचा 'सिंघम अगेन' चित्रपट आहे. यात ती लेडी सिंघमची भूमिका साकारणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news