Vijay Deverakonda विषयी चुकीची अफवा पसरवल्याने युट्यूबर अटकेत

vijay deorkonda
vijay deorkonda

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोशल मीडियचा दुरुपयोग करून अनेक चुकीच्या गोष्टी पसरवल्या जातात. पण काही अशा गोष्टा असतात की, ज्या पूर्णपणे निराधार असतात. आता सेलेब्रिटीज देखील यातून सुटलेले नाही. (Vijay Deverakonda ) एका यूट्यूबरने साऊथ स्टार विजय देवरकोंडा विषयी चुकीच्या गोष्टी पसरवल्यानंतर विजय देवरकोंडाने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत त्या युट्यूबरला अटक केलीय. (Vijay Deverakonda )

संबंधित बातम्या –

विजय देवरकोंडाने हैदराबाद पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सायबर सेलने तत्काळ युट्यबरला अनंतपूरमधून ताब्यात घेतले. विजय देवरकोंडाने तक्रीर दाखल केली होती की, त्याच्याविरोधातील चुकीचे वृत्त त्याने त्याच्या युट्यूबवर दाखवले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यूट्यूबरने विजय आणि को-ॲक्ट्रेस विषयी चुकीची माहिती दाखवली होती.

व्हिडिओ डिलीट नंतर सोडलं आरोपीला

असं म्हटलं जात आहे की, युट्यूबरला ताब्यात घेतल्यानंतर त्याला विजयचा व्हिडिओ डिलीट करायला सांगितले होते. त्यानंतर त्याला सोडण्यात आले. विजय देवरकोंडा साऊथ चित्रपट अर्जुन रेड्डी मधून लोकप्रिय झाला होता. सामंथा रूथ प्रभूसोबत त्याचा खुशी नावाचा चित्रपट रिलीज झाला होता, ज्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला होता. त्याआधी लायगर चित्रपट आला होता. पण म्हणावा तसा चालला नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news