बिग बॉस १७ : अंकिता लोखंडे-विकी जैनच्या लग्नाचा वाढदिवस होणार साजरा | पुढारी

बिग बॉस १७ : अंकिता लोखंडे-विकी जैनच्या लग्नाचा वाढदिवस होणार साजरा

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉसच्या घरात चर्चेत असलेल कपल म्हणजे अंकिता लोखंडे आणि विकी जैन. १४ डिसेंबर २०२१ रोजी त्यांच्या दोघेजण लग्नबंधनात अडकले. त्यांच्या प्रेमाची केमिस्ट्री ही सगळ्यांना माहित असून हे पॉवर कपल बिग बॉस १७ च्या घरात धुमाकूळ घालत आहे. आता कपलचा वाढदिवस बिग बॉस १७ च्या घरात अनोख्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे.

संबंधित बातम्या 

लोकप्रिय मालिका ‘पवित्र रिश्ता’ मधील ‘अर्चना’च्या भूमिकेसाठी ओळखल्या जाणार्‍या अंकिता लोखंडेने बिझनेसमॅन विकी जैनसोबत लग्न केलं. हे जोडपे त्यांचा काही मित्रांसोबत अनेक वर्षांपासून एकत्रित आहेत. अंकिता लोखंडे आणि विकी त्यांच्या नात्याबद्दल खुलेपणाने बोलतात. त्यांनी सोशल मीडियावर स्वतःचे अनेक फोटो शेअर देखील केले आहेत.

अंकिता आणि विकीची लव्हस्टोरी तितकीच खास आहे. एकमेकांना साथ देत त्यांनी अनेक चढ-उतारांचा सामना केला आणि आजही ते वैवाहिक जीवनात सुखी आहेत. बिग बॉस १७ च्या घरात ही जोडी सुपरहिट ठरत असून यंदाचा लग्नाचा वाढदिवस ते या खास घरात साजरा करणार आहेत.

Back to top button