Salaar : ‘सालार’मध्ये केजीएफ स्टार यशचा कॅमियो, तीर्था सुभाषचा खुलासा | पुढारी

Salaar : 'सालार'मध्ये केजीएफ स्टार यशचा कॅमियो, तीर्था सुभाषचा खुलासा

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रशांत नील यांच्या ‘सालार’ चित्रपटात अभिनेते यश यांचा कॅमियो असेल. हा खुलासा तीर्था सुभाषने केला आहे. (Salaar) तीर्था सुभाषने ‘सालार’मध्ये गाणं गायलं आहे आणि त्यांनी चुकून सांगितल की, चित्रपटामध्ये यश देखील आहे. (Salaar)

संबंधित बातम्या –

प्रशांत नीलच्या ‘सालार’ची फॅन्सना खूप प्रतीक्षा लागून राहिली आहे. फॅन्सना पण वाटत होतं की, KGF अभिनेता यश सालारमध्ये नक्की असेल. याआधी प्रशांत नील म्हणाले होते, ‘सालार’ आणि KGF एकमेकांशी कनेक्टेड नाहीत. यश या चित्रपटाचा भाग नसेल. आता सत्य समोर आले आहे. ‘रॉकी भाई’ यश ‘सालार’मध्ये दिसणार आहेत. ही खुलासा चाईल्ड आर्टिस्ट तीर्था सुभाषने केला आहे. तीर्था सुभाष एक गायिका म्हणून ‘सालार’शी जोडली गेली आहे. तिने एका मुलाखतीमध्ये ‘सालार’मध्ये यशचा कॅमियो असेल, असा खुलासा केला आहे.

Salaar २२ डिसेंबर रोजी रिलीज होईल. बॉक्स ऑफिसवर याची टक्कर Shah Rukh Khan स्टारर ‘डंकी’शी होईल. रिपोर्ट्सनुसार, दावा केला जात होता की, ‘सालार’ आणि KGF च्या कहाणीशी संबंधित असेल. फॅन्सने यासाठी अनेक शेरीज शोधल्या आहेत. हा दावा या आधारावर केला जात होता की, ‘सालार’ देखील KGF प्रमाणे प्रशांत नीलने दिग्दर्शित केला आहे. याशिवाय, चित्रपटामध्ये दोन पात्र , जो KGF चा एक भाग असतील.

तीर्था सुभाषने सांगितले की, ‘सालार’साठी तीन भाषांमध्ये एक गाणे गायले आहे. दरम्यान तिने चुकून सांगितले की, या चित्रपटात प्रभास, यश आणि पृथ्वीराज सुकुमारन असणार आहेत.

Back to top button