पुढारी ऑनलाईन डेस्क : 'बँड बाजा बारात', 'रब ने बना दी जोडी', 'सुल्तान', 'सूई धागा' यासारख्या चित्रपटामध्ये (Virushka 6th Anniversary) काम केलेल्या अनुष्का शर्माची आज लग्नाची ६ वी ॲनिव्हर्सरी आहे. (Virushka 6th Anniversary)
संबंधित बातम्या –
अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीची पहिली भेट २०१३ मध्ये एका शॅम्पूच्या जाहिरतीच्या शूटिंगवेळी झाली होती. त्यानंतर काही काळ दोघांनी एकमेकांना डेट केलं आणि नंतर लग्नबंधनात अडकले.
विराट कोहलीचा जन्म ५ नोव्हेंबर, १९८८ रोजी झाला होता. अनुष्का शर्माचा जन्म १ मे, १९८८ रोजी झाला होता. दोघांच्या वयात ६ महिन्यांचा फरक आहे. अनुष्का विराटपेक्षा ६ महिन्यांनी मोठी आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, अनुष्का शर्माची संपत्ती २०२३ च्या रिपोर्टनुसार, ३५ मिलियन डॉलर (२५५ कोटी रुपये) आहे. एका महिन्यात १ कोटींच्या जवळपास तिची कमाई आहे. तिच्याकडे स्वत:चा मुंबईत २०१४ मध्ये खरेदी केलेला एक लक्झरी फ्लॅट आहे. त्याची मार्केट व्हॅल्यू ९ कोटी रुपये आहे. इतकंच नाही तर BMW, Range Rover आणि Mercedes सारख्या लक्झरी गाड्यादेखील आहेत. याशिवाय ती एक चित्रपट निर्माती आहे. तिने अनेक रियल स्टेट प्रॉपर्टीजमध्ये गुंतवणूक केली आहे.
विराट कोहलीची संपत्ती अनुष्कापेक्षा अधिक आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विराट कोहलीची संपत्ती १२७ मिलियन डॉलर म्हणजेच १०४६ कोटी आहे. तो ब्रँड एंडोर्समेंटच्या माध्यमातूनही चांगली कमाई करतो. इतकचं नाही तर BCCI च्या एका कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून वर्षाचे ७ कोटी रुपये मिळतात. त्यानेदेखील अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. त्याचा एक स्वत:चा 'वन8 कम्यून' नावाचे रेस्टोरेंटदेखील आहे. सोबतच अनेक महागड्या गाड्यादेखील त्याच्याकडे आहेत.
विराट कोहलीने अनुष्का शर्माचा मोबीईल नंबर आपल्या फोनमध्ये 'डार्लिंग' सेव्ह केला आहे. अनुष्का शर्माने विराटचे नाव 'पति परमेश्वर' असे सेव्ह केला आहे.