Animal Collection : दहाव्या दिवशी ‘अॅनिमल’ नं तोडला ‘गदर २’ चा रेकॉर्ड; ७०० कोटींचा टप्पा पार

Animal Collection
Animal Collection

पुढारी ऑनलाईन डेस्क : संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर, साऊथ स्टार रश्मिका मंदाना, बॉबी देओल, तृप्ती डिमरी आणि अनिल कपूर यांचा 'अॅनिमल' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ ( Animal Collection ) घालत आहे. या चित्रपटात तृप्ती आणि रणबीरच्या इंटिमेंट सीनची तर खूपच चर्चा झाली. हा चित्रपट रिलीज होवून फक्त १० दिवस झाले आहेत. पहिल्या विकेंटसोबत आता दुसऱ्या विकेंटलाही बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने जगभरात वर्ल्डवाईड ७१० कोंटीचा टप्पा ( Animal Collection ) पार केला आहे. तर दुसरीकडे अभिनेता शाहरुख खानचा ब्लॉकबस्टर 'जवान' आणि 'पठाण' ने कमाईच्या बाबतीत मागे टाकलं आहे.

संबंधित बातम्या 

मिळालेल्या माहितीनुसार, रणबीरचा हा चित्रपट १ डिसेंबरला रिलीज होताच चाहत्यांनी संमिश्र प्रतिसाद दिला. पहिल्या विकेंडमध्ये चित्रपटाने भरघोश अशी २०० कोटींहून अधिक कमाई केली. 'अॅनिमल'ने दुसऱ्या शुक्रवारी २३ कोटी, दुसऱ्या शनिवारी ३४ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. तर दहाव्या दिवशी म्हणजे दुसऱ्या विकेंडला रविवारी ३७ कोटी रुपयांहून अधिक कमाई केली. दरम्यान दुसऱ्या वीकेंडमध्ये एकूण ९४ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे.

दुसऱ्या शनिवारी 'अ‍ॅनिमल'ने जगभरात बॉक्स ऑफिसवर ६६० कोटी रुपयांची कमाई केली. आतापर्यत चित्रपटाने १० दिवसांत जगभरात ७१० कोटींच्या टप्पा पार केला आहे. ( Animal Collection ) यामुळे बॉलिवूड अभिनेता सनी देओलच्या 'गदर २' चित्रपटाला मागे पडला आहे.

अभिनेता रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाने ओपनिंगच्या पहिल्या दिवशी म्हणजे, शुक्रवारी ६३.८० कोटींची, दुसऱ्या दिवशी म्हणजे, शनिवारी ६६. २७ कोटींची आणि विकेंटच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे, रविवारी या चित्रपटाने जबरदस्त बॉक्स ऑफिसवर ७१. ४६ कोटींची कमाई केली होती. तर चौथ्या दिवशी ४० कोटींची कमाई केली होती. गेल्या रविवारी सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूडमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा चित्रपट ठरला होता.

(Photo : viralbhayani instagram वरून साभार)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news