Ranbir Kapoor Video : जाडजूड दिसण्यासाठी रणबीरने केला प्रोस्थेटिक बॉडी सूटचा वापर | पुढारी

Ranbir Kapoor Video : जाडजूड दिसण्यासाठी रणबीरने केला प्रोस्थेटिक बॉडी सूटचा वापर

पुढारी ऑनलाईन डेस्क : चित्रपट ॲनिमल बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत प्रचंड धुमाकूळ घालत आहे. (Ranbir Kapoor Video) या चित्रपटात रणबीरचा लूक देखील खूप दमदार असायचा. आता रणबीर या लूकमध्ये खूप जाडजूड दिसत आहे. रणबीरचा हा लूक पाहून फॅन्स खूप चिंतेत होते. (Ranbir Kapoor Viral video) या चित्रपटात रणबीरचे पोट कसे काय सुटलेले दिसते, असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. पण, आता सत्य समोर आले आहे. रणबीर कपूरने या लूकला प्रोस्थेटिक बॉडी सूटच्या मदतीने कव्हर केलं होतं. (Ranbir Kapoor Viral video)

संबंधित बातम्या –

रणबीरचा व्हायरल व्हिडिओ

ॲनिमल चित्रपटामध्ये रणबीर कपूर वेगवेगळ्या लूक्समध्ये दिसत आहेत. आणि प्रेक्षकांना त्याचा लूकदेखील आवडला होता. चित्रपटाच्या एका भागात रणबीर कपूर खूप जाडजूड दिसत आहे. पण, मुळात रणबीर जाडजूड झाला नव्हता तर ते प्रोस्थेटिक बॉडी वापरून त्या प्रकारची शरीरयष्टी तयार करण्यात आलीय. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. अखेर कशा प्रकारे रणबीर कपूरचा पॉट बेली लूक तयार करण्यात आला, हे व्हिडिओमध्ये दिसते.

ॲनिमलचे कलेक्शन किती?

रिपोर्टनुसार, चित्रपट ॲनिमलने बॉक्स ऑफिसवर ७ दिवसात ३३७.५८ कोटी रुपयांचे कलेक्शन केलं. एका रिपोर्टनुसार, चित्रपटाने आठव्या दिवशी २३.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. संपूर्ण ९ दिवसात वर्ल्डवाईड ६६० कोंटीच्या घरात हा चित्रपट पोहोचला आहे. जगभरात हिंदी भाषेतील चित्रपटाने ४९.१२ कोटी, तेलुगूमध्ये ४०.३६ आणि तमिळमध्ये ३३. २५ कोंटीचा टप्पा पार केला आहे. यावरून जगभरात हा चित्रपट ६६०.८९ कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या ‘टायगर जिंदा है’, शाहरूख खानच्या ‘जवान’ आणि सनी देओलच्या ‘गदर २’ या चित्रपटाच्या पहिल्या आठवड्यातील कलेक्शनला मागे टाकण्यात यशस्वी झाले आहे.

video- ranbirkapooruniverse insta वरून साभार 
 

 

View this post on Instagram

 

A post shared by ranbirkapoor (@ranbirkapooronline)

Back to top button