Nawazuddin Siddiqui : नवाजुद्दीनचा मुलगी शोरावर प्रेमाचा वर्षाव; अनसीन व्हिडिओ व्हायरल

Nawazuddin Siddiqui
Nawazuddin Siddiqui

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी ( Nawazuddin Siddiqui ) नेहमी त्याच्या अभिनयासोबत वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत येत असतो. नुकतेच नवाजुद्दीनने त्याची मुलगी शोरा सिद्दीकीचा १४ वाढदिवस साजरा कतर पहिल्यांदा मुलीची झलक पाहायला मिळतेय. यावेळचा शोराचा एक कोलाज व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

संबंधित बातम्या 

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने ( Nawazuddin Siddiqui ) काल रविवारी मुलगी शोराचा १४ वा वाढदिवस साजरा केला. या खास निमित्ताने नवाजुद्दीन शोराचा एक कोलाज व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत शोराचे अनेक नवनविन आणि ग्लॅमरस फोटो पाहायला मिळाले आहेत. खास करून शोरा फोटोत मनमुराद फिरताना, रेस्टॉरंटमध्ये, सायकल चालवताना, डान्स करताना, वडिलांसोबत मौजमस्ती करताना हटके दिसतेय. यावेळी तिने टिशर्ट आणि जीन्समध्येच ग्लॅमरस दिसतेय. कोलाजच्या व्हिडिओमध्ये नवाजुद्दीनने शेवटी शोराला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये 'Happiest Birthday #Shora ❤️??'. असे लिहिले आहे.

नवाजुद्दीनची हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांसह अनेक बॉलिवूड कलाकारांनी शुभेच्छा देताना भरभरून कॉमेन्टस केल्या आहेत. यात चित्रपट निर्माते अनुराग कश्यपने 'हॅपी बर्थडे शोरा', अभिनेत्री रसिका दुग्गलने 'खूप सुंदर' आणि चित्रपट निर्माता आदित्य कृपलानी 'या दोघांना मिस करत आहे'. यासारख्या कॉमेन्टस केल्या आहेत. या व्हिडिओला आतापर्यत १ लाख ७७ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकी आणि पत्नी आलियाला मुलगी शोरा, मुलगा यानी अशी दोन मुलं आहेत. गेल्या वर्षी मालमत्तेच्या वादामुळे आलिया- नवाजुद्दीन घटस्फोट घेणार होते. मात्र, नंतर त्यांनी हे प्रकरण मिटवले. शोरा सध्या तिच्या आभ आलियासोबत राहते.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, नवाजुद्दीनने काही महिन्यांपूर्वी ९० च्या दशकावर आधारित थ्रिलर ड्रामा चित्रपटाची घोषणा केली होती. हा चित्रपट भानुशाली स्टुडिओ लिमिटेड आणि बॉम्बे फेबल्सचा निर्मित करणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news