Dharmendra 88th Birthday : 7 टायर केक कापल्यानंतर भावूक झाले धर्मेंद्र, सोबत सनी देओल… | पुढारी

Dharmendra 88th Birthday : 7 टायर केक कापल्यानंतर भावूक झाले धर्मेंद्र, सोबत सनी देओल...

पुढारी ऑनलाईन डेस्क : हिंदी चित्रपटातील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचा आज ८ डिसेंबर रोजी ८८ वा वाढदिवस आहे. आज फॅन्स सेव्हन टायर केक घेऊन पोहोचले. यावे‍ळी सनी देओलने वडील धर्मेंद्र यांच्यासोबत मिळून बर्थडे केक कट केला. (Dharmendra 88th Birthday) यावेळी अभिनेते धर्मेंद्र खूप भावूक झालेले दिसले. धर्मेंद्र हिंदी जगतातील एक असे अभिनेते आहेत, जे केवळ चित्रपटात अभिनय करत नाही तर, आपल्या अभिनयाने प्रेक्षकांमध्ये, फॅन्समध्ये भूरळ घातली आहे. (Dharmendra 88th Birthday)

संबंधित बातम्या –

दर‍वर्षी प्रमाणे फॅन्स आपले फेव्हरेट अभिनेते धर्मेंद्र यांचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी त्यांच्या जुहूच्या घराबाहेर पोहोचेले. फॅन्सनी मोठमोठे पोस्टर्स धर्मेंद्र यांच्या घराबाहेरील झाडांवर लावले होते, सोबत एक मोठा केकदेखील आणला होता. फॅन्ससोबत आपल्या वडिलांचा वाढदिवस सनी देओल यांनी आणखी खास बनवलं होतं.

फॅन्सनी आणलेल्या ७ टायर केकवर लिहिलं होतं-“धर्मेंद्र एक अनमोल रतन, इंटरनॅशनल फॅन क्लब”. याशिवाय केकच्या टॉवर एक किंग क्राऊन आणि संपूर्ण केकवर धर्मेंद्र यांचे फोटोज दिसत होते.

केक कटिंगवेळी धर्मेंद्रच्या ८८ व्या बर्थडेला सनी देओल भावूक झालेला दिसला. धर्मेंद्र केक कापताना फुलांचा वर्षाव झाला, यावेळी ते हसताना दिसले. फॅन्स आणि मीडियासोबत सनी देओलने मिळून बर्थडे गाणेदेखील गायले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pallav Paliwal (@pallav_paliwal)

Back to top button