

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुष्पा फेम केशव अर्थातच अभिनेता जगदीश प्रताप भंडारी याला पोलिसांनी अटक केली आहे. (Pushpa Actor Jagdish) ज्युनिअर आर्टिस्टला ब्लॅकमेल आणि जीवन संपवण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप जगदीशवर आहे. या प्रकरणात त्याला पंजागुट्टा पोलिसांनी अटक केली आहे. (Pushpa Actor Jagdish)
संबंधित बातम्या –
३० वर्षीय जगदीशने ज्युनिअर आर्टिस्टला खासगी फोटोज सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर त्या महिलेने आपले जीवन संपवले होते. त्या महिलेच्या कुटुंबीयांनी जगदीशला तिच्या मृत्यूला जबाबदार ठरवले. तक्रारीनंतर पोलिसांनी बुधवारी जगदीशला कलम ३०६ अंतर्गत अटक केली असून पोलिस रिमांडवर पाठवण्यात आले आहेत.
केशव आहे तरी कोण?
केशवचं खरं नाव जगदीश प्रताप भंडारी आहे. जगदीशने तेलुगु चित्रपट इंडस्ट्रीत काम केलं आहे. १८ जानेवारी, १९९३ रोजी तेलंगानामध्ये त्याचा जन्म झाला.
एका मुलाखतीत त्य़ाने सांगितलं होतं की, त्याने पाेलीस खात्यात जावे, अशी त्याच्या वडिलांची इच्छा हाेती; पण त्यांनी आपलं करिअर अभिनय क्षेत्रात केलं. चित्रपटात येण्यापूर्वी तो सेल्स एक्झीक्युटिव्हचा काम करायचा. तो थिएटर्समध्ये फ्रेंच फाईज आणि स्वीट कॉर्नचा पुरवठा करायचा. नंतर तो तेलंगानाहून हैदराबाद आला. खूप संघर्षानंतर प्रोडक्शन हाऊस प्रसाद स्टुडिओने आपल्या एक शॉर्ट फिल्ममध्ये त्याला भूमिका ऑफर केली.
जगदीश भंडारी २०१८ मध्ये MicTV चा यूट्यूब शो 'निरुद्योग नटुलु' दिसला होता. यानंतर त्याने २०१९ मध्ये तेलुगु वेब सीरीज 'गॉड ऑफ धर्मापुरी' मध्येही काम केलं. त्याला लोकप्रियता मिळाली ती 'माल्लेशम' चित्रपटातील (Mallesham) अंजी या भूमिकेमुळे. हा चित्रपट चिंताकिंदी माल्लेशम यांच्या जीवनावर आधारित होती. यानंतर त्याने आणखी एका बायोपिकमध्य़े काम केलं.
गोल्ड मेडलिस्ट जॉर्ज रेड्डी यांच्या आयुष्यावरील चित्रपटातदेखील त्या भीम नायक नावाच्या लेखकाची भूमिका साकारली होती.यानंतर त्याने २०२० मध्ये रोमँटिक ड्रामा वेब सीरीज 'कोथा पोराडू' मध्ये काम केलं. यामध्ये त्याची भूमिका एका साध्या तरुणाची होती. याच वर्षी दुसरी चित्रपट समाजातील जातीव्यवस्थेवर आधारित होती. यामध्येही त्याने काम केलं. या चित्रपटाचं नाव होतं -'पलासा १९७८'.