Bigg Boss 17 : अभिषेक-ईशा मालवीय यांच्यातील वाद टोकाला, नको ते केले आरोप | पुढारी

Bigg Boss 17 : अभिषेक-ईशा मालवीय यांच्यातील वाद टोकाला, नको ते केले आरोप

पुढारी ऑनलाईन डेस्क : Bigg Boss 17 रिॲलिटी शोमध्ये एक्स कपल अभिषेक कुमार – ईशा मालवीय (Bigg Boss 17 ) यांच्यातील वाद टोकाला गेला आहे. मागील एपिसोडमध्ये दोघांमध्ये इतके मोठे भांडण झाले की, अभिषेकने सर्व मर्यादा पार केल्या. अभिषेकने ईशा मालवीयवर नको ते आरोप केले. (Bigg Boss 17 )

संबंधित बातम्या –

उडारिया स्टार अभिषेक कुमार आणि ईशा मालवीय जेव्हापासून बिग बॉस- १७ मध्ये आले आहेत, तेव्हापासून त्य़ांच्या रिलेशनशिपवरून चर्चा सुरु आहे. मागील एपिसोडमध्ये दोघांमध्ये इतके मोठे भांडण झाले की, सर्व मर्यादा विसरून गेले. अभिषेक कुमारने ईशावर असे-असे आरोप केले ऐकणाऱ्यांनी कानावर हात ठेवले.

अभिषेक कुमार-ईशा मालवीय यांचा वाद ऐश्वर्या शर्मापासून सुरू झाला. राशन डिस्ट्रीब्यूशन कारमावरून ऐश्वर्याचा वाद अभिषेकशी झाला. या भांडणात ऐश्वर्याची कमी असलेल्या उंचीवरूनदेखील ट्रोल करण्यात आले. ईशाने म्हटलं की, हे तर बॉडीशेमिंग आहे. यावर अभिषेकने खानजादीची बाजू घेत ईशाला उत्तर दिले.

ईशा-अभिषेकची जोरदार भांडणे

ऐश्वर्या शर्मा आणि खानजादी यांच्यातील वादानंतर अभिषेक-ईशा यांच्यात वाद निर्माण झाला.

एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप

ईशाने म्हटलं की, तो नेहमी तिला दोषी ठरवण्याचा प्रयत्न करतो. ईशाने अभिषेकला जानवर म्हटलं. अभिषेकने देखील ईशावर पलटवार केला. तिने ईशाच्या कॅरेक्टरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. तो म्हणाला, वन नाईट स्टॅण्ड… ब्यूटी इंजेक्शन घेते. ईशाने अभिषेकच्या शरीरावर कॉमेंट केलं आणि म्हणाली की तो स्टेरॉइड घेतो.

video- 𝐀𝐁𝐇𝐈𝐒𝐇𝐄𝐊.𝐇𝐎𝐋𝐈𝐗 x वरून साभार

Back to top button