Operation Valentine Film : वरुण-मानुषीच्या 'ऑपरेशन वॅलेंटाईन'ची रिलीज डेट टळली | पुढारी

Operation Valentine Film : वरुण-मानुषीच्या 'ऑपरेशन वॅलेंटाईन'ची रिलीज डेट टळली

पुढारी ऑनलाईन डेस्क : वरुण तेज आणि मानुषी छिल्लर स्टारर ऑपरेशन व्हॅलेंटाईन ८ डिसेंबर, २०२३ रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार होती. आता निर्मात्यांनी एक अधिकृत स्टेटमेंट जारी करून खुलासा केला आहे की, चित्रपट तारीख पुढे ढकलली जात आहे. (Operation Valentine Film ) निर्मात्यांनी म्हटले आहे की, “वरुण तेज आणि मानुषी छिल्लरचा चित्रपट ‘ऑपरेशन व्हॅलेंटाईन’ प्रेक्षकांसाठी उत्तम चित्रण दाखवण्यासठी एक नवी रिलीज डेट असेल. सोबत राहा.” (Operation Valentine Film )

संबंधित बातम्या –

ऑपरेशन व्हॅलेंटाईन सोनी पिक्चर्स इंटरनॅशनल प्रोडक्शन्स, संदीप मुड्डाची रेनेसां पिक्चर्स द्वारा निर्मित आणि गॉड ब्लेस एंटरटेनमेंट (वकील खान), नंदकुमार अब्बिनेनी द्वारा सह-निर्मित आहे.

या चित्रपटाच्या माध्यमातून शक्ती प्रताप सिंह हाडा दिग्दर्शन क्षेत्रात डेब्यू करत आहेत. शक्ति प्रताप सिंह हाडा, आमिर खान आणि सिद्धार्थ राज कुमार द्वारा लिखित, ऑपरेशन व्हॅलेंटाईन तेलुगु आणि हिंदीमध्ये रिलीज होईल. नव्या रिलीज डेटची घोषणा अद्याप समोर आलेली नाही.

Back to top button