Priyanka Chopra Deepfake : रश्मिका, आलिया, काजोलनंतर डीपफेकची शिकार ठरली प्रियांका | पुढारी

Priyanka Chopra Deepfake : रश्मिका, आलिया, काजोलनंतर डीपफेकची शिकार ठरली प्रियांका

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या काही दिवसांपूर्वी साऊथ अभिनेत्री रश्मिका मदांन्ना, बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि काजोल डीपफेक व्हिडिओच्या शिकार बनल्या होत्या. यानंतर आता हॉलिवूड आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा डीपफेक ( Priyanka Chopra Deepfake ) व्हिडिओची शिकार बनली आहे. दरम्यान अभिनेत्रीचा एका संभारंभातील ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

संबंधित बातम्या 

हॉलिवूड स्टार प्रियांका चोप्रा- जोनासने काही दिवसापूर्वी एका ब्रँड प्रमोशनच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. आता त्याच कार्यक्रमातील तिचा डीपफेक व्हिडिओ समोर आला आहे. त्यावेळी प्रियांकाने स्काय ब्ल्यू कलरचा ड्रेस परिधान केला होता. आताच्या व्हिडिओमध्ये प्रियांका स्टेजवर प्रमोशनमध्ये बिझी असल्याचे दिसते. मात्र, तिच्या आवाजाचा बनावट ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

दरम्यान प्रियांकाने ब्रँडची जाहिरात करताना तिच्या वार्षिक कमाईचा आकडा सांगितला आहे. मात्र, तिच्या आवाज बदलण्यात आला आहे. पहिल्यांदा प्रियांकाने केलेल्या ब्रँड प्रमोशनचा व्हिडिओ एडिट करून नंतर त्यातील आवाज बदलण्यात आल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर त्याची क्लिप काढून सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे. ही क्लिप शेअर केलेले सोशल मीडियावरील अकांऊट फेक असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रियांकाचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. ( Priyanka Chopra Deepfake )

यापूर्वी बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट डीपफेकची शिकार झाली होती. यावेळी आलियासारखी दिसणारी एक मुलगी फुलाफुलांच्या निळ्या रंगाच्या कपडे घालून कॅमेऱ्याकडे अश्लील हावभाव करताना दिसली होती. हाही व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला होता. आलियाच्या आधी, अभिनेत्री काजोलच्या कपडे बदलणाऱ्या बनावट व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ माजवली होती.

याशिवाय साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्नाही डीपफेक व्हिडिओची शिकार बनली होती. या व्हिडिओत रश्मिकाचा बनावट चेहरा बनवून एक महिला काळ्या रंगाच्या कपड्यात योगा बॉडीसूटमध्ये दिसली होती. यातील महिलेचा चेहरा अभिनेत्री रश्मिकाच्या चेहऱ्याशी मॉर्फ केलेला होता. हाही व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. अभिनेत्रीचे असे डीपफेक व्हिडिओ व्हायरल होत असल्याने अनेक बी-टाउन सेलिब्रिटीसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही चिंता व्यक्त केली आहे.

Back to top button