Mast Mein Rahne Ka : जॅकी श्रॉफ- नीनाच्या ‘मस्त में रहने का’ चा ट्रेलर रिलीज (video) | पुढारी

Mast Mein Rahne Ka : जॅकी श्रॉफ- नीनाच्या 'मस्त में रहने का' चा ट्रेलर रिलीज (video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ आणि अभिनेत्री नीना गुप्ता सध्या त्यांच्या आगामी ‘मस्त में रहने का’ Mast ( Mein Rahne Ka )चित्रपटामुळे चर्चेत आहेत. हा एक कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटाचा आता नुकताच धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे.

संबंधित बातम्या 

अभिनेता जॅकी श्रॉफ याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आगामी ‘मस्त में रहने का’ ( Mast Mein Rahne Ka)  चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये सुरूवातीला ‘वयस्कर लोंकानी जरा जपून वागायला हवं, मात्र, शेजाऱ्यांना हाय हॅलो असे बोलावे…’ असे म्हटलं आहे. यात वयस्कार व्यक्तींनी कशाचाही विचार न करता आनंदात जीवन जगावे असे दाखविले आहे. दरम्यान यात जॅकी श्रॉफ पहिल्यांदा नव्या शहरात जातो आणि तेथील लोकाशी जपून बोलताना दिसतो. नंतर मात्र, त्याची एक मैत्रीण होते. यानंतर दोघेजण मस्त आनंदीत जीवन जगताना दिसत आहेत.

आगामी ‘मस्त में रहने का’ चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओला आतापर्यत ९ हजार ६०० हून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे. जॅकी श्रॉफ दिसणार असल्याने चित्रपटासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

‘मस्त में रहने का’ या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय मौर्य यांनी केलं आहे. तर पायल अरोरा आणि विजय मौर्य यांनी मिळून पटकथा लिहिली आहे. या चित्रपटात जॅकी श्रॉफ आणि नीना गुप्तासोबत अभिषेक चौहान, मोनिका पनवार, राखी सावंत आणि फैसल मलिक हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट ८ डिसेंबर रोजी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jackie Shroff (@apnabhidu)

Back to top button